eknath shinde

Cabinet Decision : मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब, शिंदे सरकारने घेतले ‘हे’ निर्णय

787 0

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने आज प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल स्वीकारण्यात आला आहे. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. आज पार पडलेल्या बैठकीमध्ये पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

1) मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत.
2) कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू
3) मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार
4) न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार
5) नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करणार
6) चेंबूरला अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी आयटीआय
7) नांदगाव येथील पीएम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्क 100 टक्के सूट
8) चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार. कायद्यात सुधारणा करणार

Share This News

Related Post

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 1 मे पासून ठिय्या आंदोनाचा निर्धार

Posted by - April 23, 2023 0
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य शासनाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय राज्य…
revanna

Karnataka Election Result 2024 : देशातील पहिला निकाल जाहीर; प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

Posted by - June 4, 2024 0
कर्नाटक : देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार…
Ambadas Danve

Ambadas Danve : ‘तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू…’; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Posted by - October 27, 2023 0
पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
Gulabrao Patil

Gulabrao Patil : आईनंतर आता भावाचेही निधन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Posted by - November 8, 2023 0
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या…
Pune News

Pune News : पुण्यातील आळंदीजवळ महावितरणच्या डीपीचा स्फोट; 1 जणाचा मृत्यू

Posted by - February 8, 2024 0
पुणे : आळंदी-मरकळ रोडवरील शोडू गावाजवळील एका कारखान्यातील एका गोडाऊन जवळ भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत सहा – सात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *