Swaroop Jankar

Mahadev Jankar : महादेव जानकरांचा पुतण्या लोकसभेच्या रिंगणात; ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार निवडणूक

361 0

गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने लोकशाही व्यवस्था कुमकुवत केली आहे. शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे. त्याचा गंभीर परिणाम माढा लोकसभा मतदारसंघात पहायला मिळत आहे.दहशतीच्या जोरावर विरोधी पक्षाला उमेदवार मिळू न देण्याचे षढयंत्र सुरू आहे. यापार्श्वभुमीवर भक्कम वैचारिक आणि विश्वासार्ह भुमिका घेऊन माढा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करत असल्याचे स्वरूप जानकर यांनी म्हटले आहे. सांविधानिक मूल्यांना प्राधान्यक्रम देण्याची भुमिका घेत असताना खात्रीपुर्वक माढा लोकसभा भाजपमुक्त करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केल्यानंतर आता राजकारणात सक्रिय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे. लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीच्या दिशेने वेगवान पावले टाकली जात आहेत. प्रसारमाध्यमांची उघडउघड गळचेपी सुरू असताना न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आणले गेले आहे. यापार्श्वभुमीवर प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकाने आपली योग्य भुमिका निभावणे गरजेचे आहे. त्यात पत्रकार म्हणून तर अधिकची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपला रोखण्यासाठी माढा मतदारसंघातील जनतेला आवाहन करायचे ठरवले आहे. सांविधानिक मूल्यांच्या रक्षणाची भुमिका मांडण्याबरोबरच मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन जनतेला देणार आहे. विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या शोषित – वंचित घटकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहे. राज्यातील जातीय संघर्षाच्या पार्श्वभुमीवर बहुजन एकतेचा विचार घेऊन मतदारसंघात पोहचणार आहे.

माढ्यात आयटी, ईडीचा वापर
आजमितीला माढा लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार आणि दुसऱ्या फळीतील ९० टक्के पुढारी भाजपच्या बाजूने आहेत, मात्र जनता भाजपच्या विरोधात आहे. भाजप सरकारने यापुर्वीच दोन साखर कारखानदार असलेल्या आमदारांना आयटी, ईडीची भीती दाखवून वळवले आहे. माण आणि फलटण मतदारसंघातील दोघांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यातील एक नेता तर अनुसुचित जातीतला आहे. भाजपच्या नेत्यांची भाषा उन्मत्त झाली असून विरोधात उरलेल्या नेत्यांनाही ईडीची धमकी दिली जात आहे. मतदारसंघातील लोकशाहीचे वातावरण नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा सर्व प्रकार मोडून काढून निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

पक्ष की अपक्ष, १४ ला घोषणा
माझ्या राजकीय विचारांवर फुले- शाहू- आंबेडकर- कांशीराम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे या विचारधारेला अनुसरून निवडणुकीतील भुमिका निश्चित करणार आहे. फुले- शाहू- आंबेडकरांचे नाव घेणारे पक्ष आणि उमेदवार माढ्यातही असतील, पण त्यांच्या कृतीशीलतेचा विचार करून पक्ष की अपक्ष, याचा निर्णय आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिलला घेणार आहे. त्याचदिवशी उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

चुलत्यांची ‘ती’ भुमिका मान्य
माझे चुलते महादेव जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा ऐवजी बारामतीत उभा राहण्याची घेतलेली भुमिका मला पटली नव्हती. जानकर यांना माढ्यात विजय शक्य होता, असे माझे मत होते. त्याशिवाय त्यांनी उभारलेल्या चळवळीचे नुकसान मला दिसत होते, म्हणून मी माढा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. तो माझा भावनिक निर्णय होता. त्यावेळी त्य़ांना बारामतीत मित्रपक्षांचा त्रास होऊ नये, म्हणून अर्ज परत घेतला होता. आता २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर, काही दिवसांपुर्वी माझी आणि चुलत्यांची भुमिका वेगळी आहे, असे मी जाहीर केले होते. चुलत्यांनीही ती भुमिका मान्य केली आहे. यावेळी चुलत्यांना माढ्यात वातावरण चांगले होते, पण त्यांनी परभणीत जायचा निर्णय घेतला. ही भुमिका मला व्यक्तीशः पटलेली नाही. पण यावेळी वैचारिक भुमिकेतून माढा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.

‘त्या’ धनगर उमेदवाराची प्रतिक्षा
महाविकास आघाडीकडून माढा मतदारसंघात धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून विचार केला तर महाराष्ट्रातून एकही धनगर खासदार लोकसभेला निवडून गेलेला नाही. राज्याचा विचार केला तर धनगर समाजाची सर्वाधिक संख्या माढ्यात आहे. त्याबरोबर सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहाची मतदारसंख्या १० लाखाच्या वर आहे. त्यामुळे खरंच माढ्यात महाविकास आघाडी धनगर उमेदवाराला संधी देतेय का, याची मलाही उत्सुकता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hemant Patil : हेमंत पाटलांचा पत्ता कट करत हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर

Shirur Lok Sabha : शिरूर मतदार संघात होणार तिरंगी लढत!

Karan Pawar : चर्चेतील चेहरा : करण पवार

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Amit Thackeray : ‘…हे भान सरकारला यावे’,अमित ठाकरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

तीनच्या प्रभागरचनेमुळे महापालिकेतील २९ माजी नगरसेवकांवर टांगती तलवार राहणार

Posted by - May 15, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री जाहीर केली:त्यामुळे प्रभागाबाबतची उत्सुकता संपली असली तरी इच्छुकांच्या मनात आता महिला…

मुलीचा लग्नासाठी नकार ! धमकीसाठी त्याने केला मुलीच्याच नावाचा वापर

Posted by - April 7, 2023 0
भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी…

आता महानगरपालिकेचे महापौर देखील जनताच निवडणार ? वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी महानगरपालिकेचे महापौर हे थेट जनतेमधून निवडावे आणि ही निवड पाच वर्षांसाठी असावी अशी…

बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022 0
पुणे- बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या ; जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी

Posted by - October 11, 2022 0
पुणे : निवडणुका लांबल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, अशी मागणी जिल्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *