LokSabha

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

327 0

2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी मतदान होणार असून बहुमत मिळवण्यासाठी इंडिया आघाडी तसेच NDA आघाडी प्रयत्न करताना दिसत आहे. पाहुयात लोकसभा निवडणूकीत सर्वाधिक वेळा कोण निवडून आलं?

लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार
इंद्रजित गुप्ता
इंद्रजीत गुप्ता हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लोकसभेचे सर्वाधिक काळ खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते तब्बल 11 वेळा खासदार म्हणून निवडून आले. ते 1977 ची निवडणूक सोडली तर 1960 ते 2001 दरम्यान अकरा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते पश्चिम बंगालच्या कलकत्ता दक्षिण पश्चिम, अलीपुर, बसीरहाट आणि मिदनापूर मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं.

अटलबिहारी वाजपेयी
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे 10 वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1991 ते 2009 पर्यंत सलग पाच वेळा लखनौमधून ते निवडून आले. याआधी बलरामपूर, ग्वाल्हेर आणि नवी दिल्लीतून ते निवडून आले.

पी एम सईद
काँग्रेस नेते पी एम सईद हे 1967 ते 2004 पर्यंत सलग 10 वेळा लोकसभेवर निवडून आले. 1967 मध्ये लक्षद्वीप मतदार संघ स्थापन झाल्यापासून त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं 2005 मध्ये त्यांचा निधन झालं त्यावेळी युपीए सरकारमध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री होते.

कमलनाथ
काँग्रेस नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. छिंदवाडा मतदारसंघातून ते 9 वेळा लोकसभेचे सदस्य आहेत.1980 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते.

जॉर्ज फर्नांडिस
संपसम्राट म्हणून ओळख असलेले जॉर्ज फर्नांडिस हे तब्बल 9 वेळा लोकसभेवर निवडून आले. 1967 साली संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर पहिल्यांदा मुंबई दक्षिण मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. 1977 च्या निवडणुकीसाठी ते बिहारमधील मुझफ्फरपूर येथे गेले ते तीन वेळा खासदार झाले. नंतर त्यांनी बिहारच्या नालंदा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं.

गिरीधर गमंग
गिरीधर गमंग हे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री होते. ते ओडिशातील कोरापुट मतदारसंघातून 9 वेळा लोकसभेवर निवडून गेले. गिरीधर गमंग काँग्रेसचे सदस्य होते

माधवराव सिंधिया
सिंधिया घराण्याचे वंशज माधवराव सिंधिया हे तब्बल 9 वेळा संसद सदस्य बनले. त्यांनी विविध सरकारांतर्गत रेल्वे, पर्यटन, नागरी विमान वाहतूक आणि मानव संसाधन विकास ही खाती सांभाळली

राम विलास पासवान
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे 8 वेळा खासदार झाले होते. हाजीपूरमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी 1977च्या लोकसभा निवडणुकीत 89.30 टक्के मते मिळवून विक्रम केला. पासवान यांच्याकडे 1996 पासून पाच वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या आणि सर्व सत्ताधारी आघाडींमध्ये मंत्रीपदे भूषवण्याचा विक्रम आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Govinda

Govinda : गोविंदाचा पत्ता कट; उत्तर पश्चिम मतदार संघात दिसू शकते मराठमोळी अभिनेत्री?

Posted by - March 30, 2024 0
राज्यातील काही जागांच्या वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. एक पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत स्पष्टता…

‘संजय राऊत थोडक्यात वाचले, नाहीतर…’ छगन भुजबळ असे का म्हणाले ?

Posted by - June 11, 2022 0
नाशिक- अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे संजय राऊत यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला असताना…

परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली… पाहा VIDEO

Posted by - August 13, 2022 0
परळी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 1 मे पासून ठिय्या आंदोनाचा निर्धार

Posted by - April 23, 2023 0
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य शासनाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय राज्य…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आघाडीवर

Posted by - June 4, 2024 0
दक्षिण मुंबई : दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईमधून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *