Election

Loksabha Elections : पिंपरी- चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया संपन्न

224 0

पिंपरी- चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी १०२ पीएमपीएमएल बसेस, २० मिनी बसेस, १६ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी १४२ वाहनांची व्यवस्था करण्यात करण्यात आली. मतदार संघात ५४९ मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान साहित्याचे वितरण थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून करण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी ४८ टेबलची व्यवस्था आणि २०० कर्मचारी, ५० समन्वय अधिकारी आणि मतदान यंत्र व्यवस्थापनासाठी ५० स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान कामकाजासाठी २ हजार ४३६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पथकांकडे १ हजार ६४७ बॅलेट युनिट, ५४९ कंट्रोल युनिट आणि ५४९ व्हीव्हीपॅट सुपूर्द करण्यात आले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया संपन्न झाली-

पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४०० मतदान केंद्र असून मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७७६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान पथकांकडे १ हजार २०० बॅलेट युनिट, ४०० कंट्रोल युनिट आणि ४०० व्हीव्हीपॅटचे वाटप ऑटो क्लस्टर चिंचवड येथील साहित्य वितरण केंद्रातून करण्यात आले आहे. साहित्य वितरणासाठी १६ टेबलची व्यवस्था व १२७ कर्मचारी आणि १० समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ७३ पीएमपीएमएल बसेस, १ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली असून अधिकाधिक पात्र मतदारांनी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंगला यांनी केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Elections : उरण विधानसभा मतदारसंघात ३४४ मतदान केंद्रात झाले मतदान साहित्याचे वितरण

Loksabha Elections : कर्जत विधानसभा मतदारसंघात साहित्य वितरणासाठी ४७ टेबल

Loksabha Elections : पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदानप्रक्रियेसाठी १२५ वाहनांची व्यवस्था

Maval Loksabha : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे पथके रवाना

Chatrapati Sambhaji Nagar : मोबाईलच्या दुकानातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त; छ. संभाजीनगर मध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी मोठी कारवाई

Pune Loksabha : पुण्यातील मतदानासाठी 6054 तर इतर 11 मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध; कुठल्या मतदारसंघात किती बॅलेट लागणार

Pune Crime : सिंहगड रोड परिसरात घरफोडी करणारे सराईत अटकेत; आरोपींकडून 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

 

Share This News

Related Post

पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय हे आता अजितदादांना समजणार

Posted by - June 3, 2022 0
पुणे- अजित पवार यांनी भाषणामध्ये टोलेबाजी करायला सुरुवात केली की भल्याभल्यांची भंबेरी उडते. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उदघाटनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित…

क्रिकेटर ते बिहारचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री; कशी आहे तेजस्वी यादव यांची राजकीय कारकीर्द

Posted by - August 10, 2022 0
पाटणा: भाजपासोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची…
Breaking News

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी ! केंद्रीय निवड समितीकडे ‘या’ 5 नावांचा प्रस्ताव

Posted by - January 27, 2023 0
पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडे 5 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.…
BJP Logo

BJP : भाजपकडून ‘त्या’ 6 विद्यमान खासदारांचा पत्ता कट

Posted by - March 25, 2024 0
गेल्या काही दिवसांमधील राजकारण बघता सर्वसामान्य माणसांना म्हणजेच मतदारांना आश्चर्याचे धक्के बसतील अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या…
DK Shivkumar

Karnataka Election Results 2023 : निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचे किंगमेकर डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर (Video)

Posted by - May 13, 2023 0
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता राखली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *