Maharashtra Election

Loksabha Elections : 1951 पासून ते आजपर्यंत तब्बल ‘इतके’ खासदार झाले बिनविरोध

308 0

सुरत : सुरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीत विजयी झालेले मुकेश दलाल यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे खाते उघडले आहे.
सुरत लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज प्रस्तावकांच्या स्वाक्षरींमधील तफावतीमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला.

भाजपवगळता अन्य सर्व उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडणुकीवरून काँग्रेस सहविरोधी पक्षाने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलं.परंतु ही बिनविरोध निवडीची परंपरा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून चालत आली.

देशात 1951 पासून आतापर्यंत असे 34 जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे.अलिकडच्या काळात म्हणजे 20120ला समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध जिंकली होती.अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्नी डिंपल यादव यांना बिनविरोध खासदारकीची संधी मिळाली होती.

त्याआधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण हे देखील लोकसभेवर नाशिकमधून बिनविरोध निवडून गेले होते. यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, हरेकृष्णा महताब, टी.टी.कृष्णमाचारी, पी.एम.सईद आणि एस.सी.जमीर हे देखील बिनविरोध निवडून येऊन खासदार झाले होते.1957 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 7 उमेदवार बिनविरोध जिंकले. त्याआधी 1951 च्या आणि त्यानंतर 1967 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकी 5 उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला होता. 1962 मध्ये तीन आणि 1977 मध्ये दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते, तर 1971, 1980 आणि 1989 मध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशाच पद्धतीने निवडणूक जिंकला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Elections : निवडणुकीपूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या भागातील निवडणूक रद्द होते का?

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : एक दोन नव्हे तर तब्बल 38 उमेदवार बारामतीच्या रिंगणात

Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण

Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर

मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात; थोड्याच वेळात होणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

Posted by - December 11, 2022 0
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री…

संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढणार ! गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले चौकशीचे आदेश

Posted by - May 4, 2022 0
मुंबई – पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाणे मनसे नेते संदीप देशपांडे यांना महागात पडण्याचे चिन्ह आहेत. या प्रकरणी आता…
Narendra Modi

Narendra Modi : जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका!

Posted by - April 20, 2024 0
गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडीया आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे…
Uddhav Nana and sharad pawar

ठाकरे गट आणखी दोन पाऊलं मागं? राऊतांनी सांगितले जागा वाटपाचे नवे सूत्र

Posted by - May 31, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता…
Vinod Patil

Vinod Patil : विनोद पाटलांची छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून माघार

Posted by - April 24, 2024 0
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेल्या विनोद पाटील (Vinod Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *