Ram Satpute

Solapur Loksabha : भाजपचं टेन्शन वाढणार? सोलापूरच्या राजकारणात आला ‘हा’ मोठा ट्विस्ट

448 0

सोलापूर : आज सोलापूरच्या (Solapur Loksabha) राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी सोलापुर मतदारसंघात मोठी घडामोड पाहायला मिळाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे. वंचितकडून सोलापूर लोकसभेसाठी राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती पण वंचितची स्थानिक कार्यकारिणी मदत करणार नाही, हे लक्षात आल्याने मी निवडणुकीतून माघार घेतल्याचं राहुल गायकवाड यांनी सांगितलं आहे.

मविआला मिळणार दिलासा
वंचित बहुजन आघाडीने माघार घेतल्यामुळे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून वंचितने मोठ्या प्रमाणावर मतं घेतली होती, ज्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला होता आणि भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी निवडून आले होते. 2019 च्या लोकसभेत सोलापूरमधून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर रिंगणात होते. प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून 1 लाख 70 हजार मतं मिळाली होती, तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 66 हजार 377 मतं मिळाली. भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी 5 लाख 24 हजार 985 घेऊन सोलापुरातून विजयी झाले.

2024 च्या निवडणुकीत वंचितने माघार घेतल्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता वंचितने माघार घेतल्याने प्रणिती शिंदेंना फायदा होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी

Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग

Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लतादीदींच्या आठवणींना उजाळा

Posted by - April 24, 2022 0
गानसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर म्हणजे युवापिढीसाठी प्रेरणा असून देशाच्या जडणघडणीमध्ये मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र…

5 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देणार – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? अग्निपथ योजनेवर मुख्यमंत्र्यांचा सवाल

Posted by - June 19, 2022 0
हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे, भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा…

घाटकोपर येथील मनसे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांना भोंगे लावल्याप्रकरणी अटक

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- घाटकोपर येथील मनसेचे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांना अटक करण्यात आली आहे. भानुशाली यांच्या कार्यालयातून पोलिसांनी भोंगे जप्त केले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *