Prakash Ambedkar

Loksabha Elections : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी दिला पाठिंबा

439 0

मुंबई : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) जागावाटपाचा महाविकासआघाडी आणि महायुतीचा तिढा अजूनही कायम आहे. आतापर्यंत भाजपने 20 तर काँग्रेसने 7 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, यातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांनी महाविकासआघाडीला 26 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
‘कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आम्ही पक्ष म्हणून आणि आयडोलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर अशी भूमिका घेत असतो. शाहू महाराजांची विचारसरणी आणि चळवळीच्या जवळचं कुटुंब मानतो. पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने केले जातील. मागे जे घडलं होतं ते या वेळेस न घडू देणं याची दक्षताही त्याठिकाणी घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे, त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : कोथुर्णे गावातील ‘त्या’ चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला

Onion Export : 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम; सरकारचा मोठा निर्णय

Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Share This News

Related Post

Ajit Pawar and Narendra Modi

Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : अजित पवार

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा दिला. त्यांनतर अजित पवारांनी (Ajit…

नितीन गडकरींपाठोपाठ आता रावसाहेब दानवे शिवतीर्थावर ; राज ठाकरेंची घेतली भेट

Posted by - April 9, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लवकरच मी भेट घेणार आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत काही दिवसांपुर्वी…

मोठी बातमी : नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

Posted by - September 27, 2022 0
नवरात्र उत्सव : यंदाच्या नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात…

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक ! शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडखोरीने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर काळे ढग जमा झालेले आहेत. या बंडखोर आमदारांच्या…

आमदार संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र, ‘काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली….’

Posted by - June 23, 2022 0
औरंगाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घालून परत येण्याचे आवाहन केले. त्यानंतर रात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *