Loksabha Election

Loksabha Election : रणसंग्राम लोकसभेचा: महाराष्ट्रातील ‘या’ 5 मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

429 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी (Loksabha Election) पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे मात्र यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अजून घोषित करण्यात आले नाहीत कारण ठाण्यावर भाजपने तर नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाशिक आणि ठाण्याची उमेदवारी मात्र जाहीर करण्यात आली नाही.नाशिकच्या हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध आहे, त्याचवेळी राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या घरच्या ठाण्याच्या जागेवरच भाजपने दावा केला आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिंदेही ती जागा सोडण्यास तयार नाहीत. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या पहिल्या यादी जाहीर झाल्यानंतर ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना अशी 5 ठिकाणी लढत होणार.

तर पाहुयात कोणत्या ठिकाणी सेना विरुद्ध सेना अशी लढत होणार
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे

शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे

बुलढाणा- नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव

हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील

मावळ- संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे

तर या शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Smita Wagh : चर्चेतील चेहरा : स्मिता वाघ

Govinda : अभिनेता गोविंदा बनणार का राजकारणात पुन्हा एकदा हिरो नंबर 1?

Pune News : पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये युस्टाच्या नवीन दालनाचा अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते दमदार शुभारंभ

Meenakshi Patil : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

Share This News

Related Post

Devendra Kumar Upadhye

Devendra Kumar Upadhye : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. देवेंद्र उपाध्याय यांची नियुक्ती

Posted by - July 25, 2023 0
मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे, पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा….दर्शना पवार शेवटच्या भाषणात म्हणाली…

Posted by - June 21, 2023 0
पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण…
Chandrapur

बंद पडलेली बुलेट चेक करत असताना टिप्परच्या धडकेत माय-लेकांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 22, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चंद्रपुरातील नागभीड – तडोधी या मार्गावर (Nagbhid – Tadhodi…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *