Narayan Rane

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

236 0

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते. मात्र भाजपकडून या जागेसाठी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला आहे.

नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्यासोबत राहू. सध्या आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं. त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात असलेला वाद आता संपला आहे.

नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत होणार सामना
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदार संघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Related Post

Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टातील आजच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे ; उद्या पुन्हा सुनावणी

Posted by - August 3, 2022 0
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सत्तेचा सारीपाठ रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

#BJP HEMAT RASANE : भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी तिकीट जाहीर झालेले हेमंत रासने यांचा संपूर्ण परिचय

Posted by - February 4, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले…
Ramdas Athawale

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Posted by - April 8, 2024 0
मुंबई : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीत तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच चुकीची…
Ajit Pawar

Ajit Pawar : आधी विरोध केला आता प्रचार करणार; अजितदादांच्या विरोधकांना यंदा करावा लागणार त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार

Posted by - March 30, 2024 0
पुणे : अजित पवार (Ajit Pawar ) यांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा आणखी किचकट झाला आहे.…

पवारांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी मनसेची व्यूहरचना; वसंत मोरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

Posted by - August 23, 2022 0
पुणे: भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 नुसार काम सुरू केले आहे. भाजप पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *