loksabha

Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघांवर असणार साऱ्यांचं लक्ष

472 0

पुणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार असून मतमोजणी ही 4 जून रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत आपल्याला अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील 7 जागांवर संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. कारण लढती खूप लक्षवेधी ठरणार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला पक्षफुटीने तडे गेले असताना पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांत तुल्यबळ लढती रंगणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे 7पैकी 5 खासदार आहेत. भाजप 3 तर शिंदेसेना 2 महाविकास आघाडीकडे बारामती आणि सातारा या ठिकाणीच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार आहेत. काँग्रेसचा एकही खासदार नाही. भाजपने 4, शिंदेसेना 2 तर राष्ट्रवादी अजित पवार गट 1 जागेवर लढत आहेत. अजित पवार गटाकडे एकही खासदार नाही आणि त्यांना बारामतीची एकमेव जागा मिळाली आहे.काँग्रेसने कोल्हापुरात शाहू छत्रपती तर सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांना उतरविले आहे. सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने भाजपचे संजय काका पाटील यांच्यापुढे उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात मुख्य लढत होतं आहे. सोलापुरात भाजपचे राम सातपुते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी लढत होत आहे.माढा मतदारसंघात भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक यावेळी चुरशीची झाली. भाजपमध्ये असणाऱ्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात उतरले तर माजी मंत्री, फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी बंडाचे निशाण हाती घेतल्याने माढ्याची लढत चुरशीची होणार आहे.

बारामती आणि साताऱ्यात शरद पवार विरूद्ध अजित पवार अशीच लढत महाराष्ट्राला पाहायला मिळणार होती. मात्र, सातारची जागा भाजपने उदयनराजे यांच्यासाठी प्रतिष्ठेची करून घेतली ते राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीकडून गत निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र, राजीनामा देऊन भाजपकडून लढले त्यात त्यांचा पराभव झाला. साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होतं आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांची निर्णायक ताकद असल्याने महाविकास आघाडीला उमेदवार देताना दमछाक झाली. शेट्टी यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उद्धवसेनेने रिंगणात उतरविले आणि शिंदेच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील लढती
कोल्हापूर
शाहू छत्रपती (काँग्रेस) विरुद्ध संजय मंडलिक (शिवसेना)

हातकणंगले
सत्यजित पाटील ( शिवसेना उबाठा) विरुद्ध धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी)

सांगली
चंद्रहार पाटील (शिवसेना उबाठा) – संजय पाटील (भाजप) – विशाल पाटील (अपक्ष)

सोलापूर –
प्रणिती शिंदे (काँग्रेस) – राम सातपुते (भाजप)

माढा –
धैर्यशील मोहिते-पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) रणजितसिंह निंबाळकर (भाजप)

सातारा –
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट) – उदयनराजे (भाजप)

बारामती –
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) – सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : …तर विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार; मनोज जरांगे पाटलांची पुण्यात मोठी घोषणा

Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Pune Porsche Accident Case : अपघाताच्यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक ! मराठा आरक्षणापायी मराठवाड्यात दोघांनी संपवलं जीवन

Posted by - January 13, 2024 0
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील काही दिवसांत मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. आत्महत्या करू नका असे…
Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Highway : पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक आज दुपारी होणार बंद ; काय आहे नेमके कारण?

Posted by - July 24, 2023 0
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai – Pune Highway) आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12…
Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

Posted by - March 19, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही…
Geeta Jain

Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी पालिका अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणात ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Posted by - June 27, 2023 0
ठाणे : आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी 20 जून रोजी पालिका अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. पेंकरपाडा भागात…

मुंबई : बीकेसी मैदानावर कार्यक्रमाला सुरुवात ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा; म्हणाले ” काही लोकांनी बेईमानी केली…!”

Posted by - January 19, 2023 0
मुंबई : मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत बीकेसी मैदानावर उपस्थित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *