Prakash Ambedkar

VBA Manifesto : वंचितने लोकसभेसाठीचा जाहीरनामा केला जाहीर

522 0

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (VBA Manifesto) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला.

काय म्हणाले जाहीरनाम्यात?
वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात “एनआरसी NRC आणि CAA हा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे, असं दाखवलं जात आहे. पण त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळात ज्यांना पेंढारी म्हटलं जात होते आणि आता ज्याला VJNT आपण म्हणतो. त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे. भारतीय जनता पक्ष इथल्या हिंदू मतदारांना फसवत आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. “NRC आणि CAA मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण प्रत्यक्षात ते 20 टक्के हिंदू समाजाच्या विरोधात आहे,” असंही या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.

जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे?
कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचं कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल, असंही जाहिरनाम्यात नमूद करण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातो आणि तो अर्थव्यवस्थेवर बोजा आहे, असं आम्ही मानतो. शिक्षण हे खासगी करुन शिक्षण महर्षींनी कैद केलं आहे. या शिक्षण धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षणाबाबत सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रात शिक्षणावर फक्त 3 टक्के तरतूद आहे, राज्यात 5 टक्के तरतूद आहे. शिक्षण ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. म्हणून त्याला 9 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

अ‍ॅड आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे, तिला आम्ही थांबवणार आहोत. नवीन औद्योगिक धोरण राबवणार आहोत, ज्यामुळे शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रती क्विंटल भाव किमान 9 हजार आणि सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव दिला जाईल. शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीनं आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे.”

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे, ही मागणी देखील आम्ही करत आहोत. आम्ही सरकारमध्ये आल्यावर एससी, एसटी यांना जे आरक्षण मिळत आहे, त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत, त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहे. त्यावरून आपल्याला कळेल की त्या उमेदवाराचा समाज आम्ही का अधोरेखित केला आहे, हे आम्ही सांगणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांनी केली तपासणी

RCB आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी ठरणार का पात्र?

Pune News : खळबळजनक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Pune News : काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Suhas Diwase

Pune News : बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Posted by - May 4, 2024 0
पुणे : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता (Pune News) मंगळवार 7 मे रोजी मतदान होत असून मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी…
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - May 11, 2024 0
पुणे : ऊन पावसाचा खेळ संपूर्ण राज्यात सुरु असताना पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान…
Ajit Pawar

Ajit Pawar : मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांनी माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम केला रद्द

Posted by - October 28, 2023 0
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार…
Suicide

धक्कादायक ! जळगावमध्ये महिलेची पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Posted by - May 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने तिच्या पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह शेतातील विहिरीत उडी…
Gautami Patil Dance

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; पोलिसांकडून बंद पाडण्यात आला शो (Video)

Posted by - May 13, 2023 0
सोलापूर : गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमी पाटील महाराष्ट्राच्या गावागावात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *