Lok Sabha

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

337 0

मुंबई :  2019 प्रमाणेच याही लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवली होती. यामुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा मोठा फटका हा आघाडीला बसला होता. यावेळी देखील वंचितने लोकसभेसाठीचे 19 उमेदवार जाहीर केले आहेत. 2019 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जवळपास सात जागांवर वंचितच्या या निर्णयाचा फटका हा काँग्रेस आघाडीला बसला. या निवडणुकीत वंचितच्या 15 उमेदवारांना नव्वद हजार ते तीन लांखापर्यंत मतं मिळाली होती.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याहीवेळी महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत युती होऊ शकली नाही. 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीला राज्यातून एकूण 14 टक्के मतदान झालं होतं. तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत वंचितच्या प्रभावामुळे 7 जागांवर मविआच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे. त्या 7 जागा कोणत्या आहेत जाणून घेऊयात…

‘या’ 7 जागांवर मविआला बसणार फटका
बुलढाणा – गेल्यावेळी बुलढाण्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा 133287 मतांनी पराभव झाला होता. तर वंचितचे बळीराम सिरस्कार यांना या मतदारसंघात 172667 इतकं मतदान झालं होतं.

गडचिरोली, चिमूर – या मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव उसेंडी याचा 77526 मतांनी पराभव झाला होता. तर वंचितचे रमेश गजबे यांना एक लाख 11 हजार मतं मिळाली होती.

सांगली – सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांचा 164352 मतांनी पराभव झाला होता. तर वंचितचे गोपीचंद पडळकर यांना तीन लाख 234 मतं मिळाली होती.

परभणी – परभणीमध्ये आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा 42199 मतांनी पराभव झाला होता, तर वंचितचे आलमगीर यांना 149946 एवढं मतदान झालं होतं.

हातकणंगले – स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा 96 हजार 39 मतांनी पराभव झाला होता, तर वंचितचे अस्लम सय्यद यांना एक लाख 23 हजार 419 मत मिळाली होती.

सोलापूर – सोलापूरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा 158608 मतांनी पराभव झाला होता. तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एक लाख 70 हजार एवढं मतदान झालं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Related Post

Jalgaon Crime

पत्नी, मुलगा घराबाहेर पडताच बापाने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Posted by - May 18, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद (Nasirabad) येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन…

ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवार यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

Posted by - March 4, 2022 0
मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्यामुळे राज्य सरकारला एक मोठा झटका बसला आहे. याच…

मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…
Anil Gote

Anil Gote : शरद पवारांना मोठा धक्का ! प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे राष्ट्रवादीतून बाहेर

Posted by - August 9, 2023 0
धुळे : पक्षीय गटबाजीच्या राजकारणासाठी आपण अपात्र (Anil Gote) आहोत. यामुळे अशा गटबाजीला कंटाळूनच राष्ट्रवादीतून स्वखुशीने (Anil Gote) बाहेर पडलो,…

चांगले काम करा ; महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत – अजित पवार

Posted by - April 20, 2022 0
कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेने तुमच्यावर मोठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *