Prakash Ambedkar

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

260 0

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) राज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. मात्र वंचितने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात काही ठिकाणी तिरंगा किंवा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अशीच लोकसभेची जागा म्हणजे अमरावती लोकसभा. सध्या हा मतदार संघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या ठिकाणी आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मत विभाजनामुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होऊ नये यासाठी आपण काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिल्याचं गवई यांनी म्हटलं आहे. तसेच आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते वंचितच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपसुद्धा गवई यांनी यावेळी केला.

अमरावतीमध्ये होणार चौरंगी लढत
भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रहारनं देखील या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला आहे. तर दुसरीकडे रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

राज ठाकरे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये ; ” अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा ” कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना

Posted by - August 22, 2022 0
मुंबई : ” लोक सध्याच्या राजकारणाला वैतागले आहेत . त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे . लोक आपला विचार करत…

चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

Posted by - April 12, 2023 0
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकून उलटली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.…
Shirpur Police

Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

Posted by - April 2, 2024 0
धुळे : दारू विक्री व वाहतुकीस बंदी असताना सर्रासपणे दारूची अवैधरित्या वाहतूक (Shirpur Police) केली जाते. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी…

‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ उपक्रमास सुरुवात; बायोसीएनजीवर पीएमपीएमएलच्या दोन गाड्या धावणार

Posted by - July 2, 2022 0
पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मीतीचा प्रकल्प सुस रस्ता येथे उभारण्यात आला आहे.ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक…

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022 0
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *