Eknath Shinde Sad

Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना

326 0

मुंबई : राज्यातील जागा वाटपाचा (Loksabha) तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी हे हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्यामुळे प्रचंड नाराज आहेत. अशीच एक जागा धाराशिव लोकसभेची आहे. ही जागा शिवसेनेची हक्काची जागा आहे. कारण या जागेवरून ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे या जागेवर आता शिंदे गटाने दावा सांगितलेला आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे घेत या जागेवर अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे धाराशिव मधील शिवसेनेचे पदाधिकारी प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यामुळे ही जागा पुन्हा शिवसेनेला मिळावी, अशी आग्रही भूमिका घेऊन धाराशिव मधून तब्बल 25000 शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 3000 गाड्यांचा ताफा घेऊन हे शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्याकडे निघालेले आहेत. या जागेसाठी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक आहेत. त्यामुळे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात हे शिवसैनिक मुंबईकडे रवाना झालेले आहेत. तर हे शिवसैनिक वर्षा बंगल्यासमोर शक्तिप्रदर्शन देखील करणार आहेत.

धाराशिव ची जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. त्यामुळे ती शिवसेनेलाच परत मिळाली पाहिजे, ही मागणी शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे करणार आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास पुढील निर्णय घेण्याचा इशारा देखील दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Related Post

Shashi Tharoor

Lok Sabha Elections : देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण होणार? शशी थरूर यांनी सुचवली ‘ही’ 2 नावे

Posted by - October 17, 2023 0
नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष…
Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जीच्या गाडीचा अपघात; डोक्याला झाली दुखापत

Posted by - January 24, 2024 0
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने…

Bridge Course : ‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा ‘हा’ खास उपक्रम ; उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - August 25, 2022 0
कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले तरी त्या काळात शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्याने त्यांचे शिक्षण योग्य रितीने…

पंढरपुरात माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास (व्हिडिओ)

Posted by - February 12, 2022 0
पंढरपूर- आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास करण्यात आली असून पंढरपुरात जवळपास…

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केली हेल्पलाईन; माहिती पाठविण्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचं आवाहन 

Posted by - March 18, 2023 0
आवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवावी असं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *