Lok Sabha Elections

Lok Sabha Elections : हर्षवर्धन जाधव पुन्हा छ. संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

394 0

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) बिगूल वाजलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महायुतीकडून अद्याप कोणालाही उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता जिल्ह्याच्या राजकारणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक आहेत.

काय म्हणाले हर्षवर्धन जाधव ?
‘मराठा आरक्षणाच्या अनुषगांने मनोज जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलं, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्यांना आणा. ज्यांनी काम केलं त्यांना निवडून आणा. ज्यांनी काम केलं नाही त्यांना पाडा. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार मी एकमेव आमदार आहे. जनतेची कामं देखील केलेली आहेत. गेल्यावेळी जलील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता. मात्र आता प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत नाहीयेत. तर दुसरीकडे खैरेंना देखील फुटीचा मोठा फटका बसू शकतो. शिवसेनेत दोन गट झाले आहेत. मात्र गेल्या वेळी मला जे मतदान झालं ते मतदान मला फिक्स होणार आहे. मला वाटतं मी सामान्य जनतेसाठी लढलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे,’ असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

तसेच प्रकाश आंबेडकर यांनी जर संधी दिली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरू, अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. हर्षवर्धन जाधव यांची यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री होणार असल्यानं निवडणुकीत मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Related Post

LokSabha

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Posted by - April 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

‘मुख्यमंत्री राज ठाकरे’; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनसे नेत्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

Posted by - October 16, 2022 0
मुंबई: मनसे अध्यक्ष राज यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुण्याच्या करसवलतीसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.…

महाविकास आघाडीचा आज महामोर्चा; थोड्याच वेळात होणार मोर्चाला सुरुवात

Posted by - December 17, 2022 0
महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड…

सीमाप्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का ? सीमावादाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक 

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत…

राज ठाकरे ‘या’ दिवशी करणार अयोध्या दौरा

Posted by - April 17, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *