Maharashtra Political Crisis

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

271 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha) बिगूल वाजलं आहे. यामुळे प्रचाराला मोठा वेग आला आहे. एकमेकांवर टीका- टिपण्णी केली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. अनेक पक्षांच्या यादीमध्ये स्टार प्रचारक म्हणून आपल्या मित्र पक्षातील नेत्यांची नावं देखील आहेत. मात्र आता निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयानुसार त्यांना आता अशा स्टार प्रचारकांची नावं वगळावी लागणार आहेत.

काय आहे नवीन निर्णय?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे निवडणूक लढविणाऱ्या पक्षाचेच सदस्य असायला हवेत, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता या आदेशानुसार विविध पक्षांना अशी नावे आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळावी लागणारआहेत.

दरम्यान भाजपाकडून जी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची देखील नावं आहेत. मात्र आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही नावे आता वगळावी लागणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आजपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणार गाव / प्रभाग भेट

Posted by - February 5, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी गाव / प्रभाग भेटीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी…
KCR

KCR : उद्या एकादशी अन् आज केसीआरच्या ताफ्याला धाराशिवात बोकडाच्या मटणाची पार्टी

Posted by - June 26, 2023 0
सोलापूर : बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) हे आषाढी वारीनिमित्त दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.…

राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती

Posted by - March 28, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर एकेकाळी टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार माजीद मेमन यांनी आता मोदींचं…

#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Posted by - February 9, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम,…

One Nation One Election : देशात एकाच वेळी होणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले…

Posted by - November 10, 2022 0
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात एकाच वेळी घेण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *