Eknath Shinde Sad

Lok Sabha Elections : ‘आता शिंदे राजीनामा देणार का?’ ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने मुख्यमंत्र्यांना डिवचलं

299 0

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) वार वाहू लागलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणुकीचे वेध लागले असून, प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे महायुतीकडून महाराष्ट्रातील एकाही लोकसभेच्या उमेदवाराची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंना जोरदार टोला लगावला आहे.

काय म्हणाले अनिल परब?
‘भाजप अनेक जागांवर अग्रही असल्याचं दिसून येत आहे, बातम्या आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकत असतो. शिंदे म्हणाले बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नाही. एकनाथ शिंदे यांनी तेव्हा म्हटलं होत की मी माझ्या माणसांणा पुन्हा निवडून आणेल. जर एकही नेत्याचा पराभव झाला तर मी राजीनामा देईल. आता राजीनामा सोडा आधी त्या निवडून आलेल्या खासदारांना उमेदवारी तर द्या, नाहीतर राजीनामा ते देणार आहेत का हे त्यांना विचारा’ असा टोला परब यांनी शिंदे यांना लगावला आहे.

ठाण्याच्या जागेवर चर्चा होऊ शकत नाही. दिघे यांनी बाळासाहेबांना गळ घालून ही जागा शिवसेनेकडे आणली होती, अजून ती जागा आपल्याकडे आहे. जर ठाण्याच्या जागेवर बार्गेनिंग होत असेल तर आनंद दिघेंचा फोटो त्यांना यापुढे काढावा लागेल असेदेखील अनिल परब म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरेंच्या घोषणांमुळे मविआमध्ये धुसफूस; आंबेडकरांच्या ‘त्या’ पत्राने वाढवलं टेन्शन

Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार

Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर

Ustrasana : उष्ट्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे ?

Share This News

Related Post

पीडितेने कोर्टासमोर ‘इन कॅमेरा’ दिलेली माहिती खोटी होती का ? चित्रा वाघ यांचा सवाल(व्हिडिओ)

Posted by - April 12, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं खळबळजन खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण…

पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला…

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य; दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 24, 2022 0
मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने…
Mumbai Map

महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; नवीन यादी आली समोर

Posted by - May 17, 2023 0
मुंबई : राज्यात 2014 पासून नवीन जिल्हा (New District) तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार (Population) जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला…
Ratnagiri News

Ratnagiri News : ट्रक – दुचाकीच्या भीषण अपघातात 26 वर्षीय इंटिरिअर डेकोरेटरचा दुर्दैवी अंत

Posted by - October 19, 2023 0
रत्नागिरी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर अपघाताचे हॉटस्पॉट बनला आहे. खेड तालुक्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *