Mahavikas Aghadi

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

190 0

मुंबई : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी (Lok Sabha Election Result 2024) देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित आघाड्यांची मोठी पिछेहाट झाली आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

येत्या चार महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे जनमताची हीच हवा कायम राहिल्यास महाविकास आघाडीला 150 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर विजय मिळू शकतो. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मजल 125 जागांपर्यंत जाऊ शकते. महाराष्ट्रात विधानसभेतील बहुमताचा आकडा 145 इतका आहे. त्यामुळे 150 जागांवर विजय मिळाल्यास आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सहजपणे सत्तेत येऊ शकते, असे लोकसभेच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी
काँग्रेस- 13 जागा (16.92 टक्के)
भाजप- 9 जागा (26.18 टक्के)
ठाकरे गट- 9 जागा (16.72 टक्के)
शरद पवार गट- 8 जागा (10.27 टक्के)
शिंदे गट- 7 जागा (12.95 टक्के)
अजित पवार गट- 1 जागा (3.60 टक्के)

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
भाजप- 240
काँग्रेस- 99

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर; ‘हे’ आहे कारण

Posted by - April 24, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत गानकोकिळा लता…
Karnataka Congress

Karnataka Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे काँग्रेस सरकार कोसळणार; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 26, 2023 0
बेळगाव : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार (Karnataka Congress) पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार…

मोठी बातमी! अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Posted by - January 4, 2023 0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का बसला असून…
Supriya Sule

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Posted by - May 7, 2024 0
बारामती : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) थेट काटेवाडी येथील अजित पवारांच्या…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा

Posted by - May 3, 2024 0
पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना पाठींबा जाहीर केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *