Vasant More

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

438 0

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून (Vasant More) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती, महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीसाठी दौरे करत आहेत. पुण्यात गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक दौरे केले. तर पुणे शहराची जबाबदारी अमित ठाकरेंकडे सोपवली आहे. पुण्यात मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेही इच्छुक आहेत. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लोकसभेसाठी तयारीदेखील सुरु केली. मात्र नुकतीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट केली. या पोस्टवरून मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

काय लिहिले पोस्टमध्ये?
वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आता व्हायरल होत आहे. मनसेत यामुळे खळबळ उडाली असून पुण्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होते. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली – नितीन गडकरी

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

“पक्ष देईल तो आदेश पाळणारा मी कार्यकर्ता, मी अपक्ष निवडणूक… !” वाचा सविस्तर

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेतली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शरद पवार यांनी देखील अंधेरी पूर्व…

Nitin Gadkari : नितीन गडकरींना भर सभेत आली चक्कर; Video आला समोर

Posted by - April 24, 2024 0
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सगळेच बडे नेते प्रचारासाठी जोर लावत आहेत.यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या…

महत्वाची बातमी ! मुंबईतील 72 % मशिदींनी स्वतःहून बंद केले भोंगे

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले. विरोधी पक्षांनी राज ठाकरे…

आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धा

Posted by - November 24, 2022 0
आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धाहजारों भाविकांच्या उपस्थितीत व टाळ्यांच्या गजरात भागवत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *