Sharad Pawar

Latur News : ‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

524 0

लातूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे पडघम आज पासुनच सुरू (Latur News) झाल्याची स्थिती आहे. माजी आमदार विनायकराव पाटील यांनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वत: विनायकराव पाटीलांनी जाहीर केला आहे. 29 ऑक्टोबर रोजी ते शदर पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश करणार आहेत.

‘या’ कारणामुळे पक्ष सोडण्याचा घेतला निर्णय?
यावेळेस ही गटबाजी संपेल आणि आपली उमेदवारी निश्चित होईल अशी आशा विनायकराव पाटील यांना होती. मात्र जिल्हाध्यक्षपदी त्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले उमेदवार दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे विनायकराव पाटील समर्थक गटामध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यातच भाजपाचे जिल्ह्यामध्ये अनेक गट तट तयार झाल्याने विनायकराव पाटील यांची भाजपामध्ये घुसमट होत होती. त्यातच सगळे विरोधक हे एकत्र आलेत त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभे राहिल्यास मतदार आपल्या बाजूने येतील हे लक्षात घेत विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत विनायकराव पाटील?
विनायकराव पाटील हे लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आलेत.राज्यमंत्री पदी त्यांनी काम देखील केलं आहे. गत वेळेस भाजपातील गटबाजीचा फटका त्यांना बसला होता.यात त्यांचा पराभव झाला.पण त्यांचा हा निर्णय अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह सध्या आहेत. गेल्या वेळेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

Share This News

Related Post

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : अमेठी मधून स्मृती इराणी पराभूत

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र करू नका; आमदार रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Posted by - October 22, 2023 0
पुणे : बिअरवरील उत्पादन शुल्क कपात करून राज्य सरकारला महाराष्ट्राचा ‘मद्य’राष्ट्र करायचे आहे का? सरकारने तरुणांना बिअरकडे वळवण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी…
Buldhana News

Buldhana News : बहिणीची ‘ती’ भेट ठरली अखेरची ! तीन भावांना एकत्र गमवावा लागला जीव

Posted by - August 11, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Buldhana News) नांदुरा येथे दुचाकीने…

घाटकोपर येथील मनसे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांना भोंगे लावल्याप्रकरणी अटक

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- घाटकोपर येथील मनसेचे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांना अटक करण्यात आली आहे. भानुशाली यांच्या कार्यालयातून पोलिसांनी भोंगे जप्त केले आहेत.…

मालेगावात काँग्रेसच्या 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजित पवारांची नगरसेवकांना सूचना

Posted by - January 27, 2022 0
मुंबई- मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *