Kirit Somayya

Kirit Somayya : CA ते राजकारणी कसा आहे किरीट सोमय्यांचा राजकीय प्रवास

643 0

मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून त्यांना जेरीस आणणारे भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय… या व्हिडिओमुळे सोमय्या (Kirit Somayya) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. किरीट सोमय्या यांचा आजवरचा नेमका प्रवास राहिला चला जाणून घेऊयात…

1954 मध्ये मुलुंडमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात किरीट सोमय्या यांचा जन्म झाला. किरीट सोमय्या व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट 1975 मध्ये आणीबाणी विरोधात लढा देत असताना जयप्रकाश नारायण यांच्या भाषणांनी प्रभावित होत किरीट सोमय्या राजकारणात सक्रिय झाले. मुंबईतील मुलुंड, घाटकोपर या गुजरातीबहुल भागात गरब्याचं आयोजन केल्यानं सोमय्या प्रसिद्धीच्या झोकात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर सोमय्यांनी आडवाणी यांना देखील गरबा कार्यक्रमासाठी बोलावलं होतं.1991 मध्ये किरीट सोमय्या मुलुंड विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी वामनराव परब यांना डावलून पक्षाने सोमय्यांना तिकीट दिलं होतं त्यावरून मोठी नाराजी पाहायला मिळाली होती.आमदार असताना किरीट सोमय्या यांनी गुंतवणूकदार संरक्षण कायदा आणि शवविच्छेदन कायदा असे दोन महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेतले होते.

Raigad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनाग्रस्तांना दिला धीर

केवळ मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं असलेले हाउसिंग सोसायटी कन्वेयंस विधेयकही त्यांनीच सादर केलं होतं त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचा तब्बल 7 हजार मतांनी पराभव करत सोमय्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून विजयी 1999, 2004, 2014 अशी 15 वर्ष ईशान्य मुंबई मतदारसंघातून किरीट सोमय्या खासदार म्हणून काम करत होते. 2019 च्या शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत होते.दरम्यान अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं नेमके सोमय्या यांनी आरोप केलेले नेते कोण पाहुयात…

केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारविरोधात स्कॅम एक्सपोज कमिटी स्थापन केली होती किरीट सोमय्या (Kirit Somayya) हे त्या समितीचे राष्ट्रीय संयोजक होते त्यावेळी 16 राज्यातील सुमारे 100 जिल्ह्यांमध्ये फिरून यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवलं होतं. महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि सुनिल तटकरे यांना अडचणीत टाकणारा सिंचन घोटाळा, अशोक चव्हाणांना गोत्यात आणणारा आदर्श घोटाळा कशी अनेक प्रकरण सोमय्या यांनी बाहेर काढली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचं दापोलीतील साई रिसॉर्ट अवैध असल्याचं सांगत ते पाडण्यात यावं म्हणून हातोडा घेऊनसोमय्या दापोलीत दाखल झाले होते त्यावेळी किरीट सोमय्या आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट देखील झाली होती. एकंतरीच काय तर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणाबाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्यांचा यावेळी मात्र अश्लील व्हिडिओमुळे पाय खोलात गेल्याचा पाहायला मिळत आहे. आता या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Related Post

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया… काय म्हणाले राऊत ?

Posted by - April 5, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. या कारवाई नंतर संजय…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Posted by - March 24, 2022 0
पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…

Mumbai to Ahmedabad : बुलेट ट्रेन 2026 पर्यंत धावणार

Posted by - July 21, 2022 0
मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताच बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत पुन्हा…
Sangli Crime

Sangli Crime : सांगली हादरलं ! सांगली बस स्थानकात भरदिवसा रंगला खुनी थरार

Posted by - August 27, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Sangli Crime) कवठेमहांकाळ बस स्थानकात किरकोळ कारणावरून महाविद्यालयीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *