अखेर ठरलं! महादेव जानकर परभणीतून लढवणार लोकसभा निवडणूक

4946 0

माझी पशुपालन व दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 24 मार्च रोजी महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय जाहीर केला आणि याचवेळी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळणार हे निश्चित झालं.

महादेव जानकर हे माढा लोकसभेतून लढणार की परभणी लोकसभेतून लढणार हे मात्र ठरलं बाकी होतं अशातच आता महादेव जानकर हे परभणी लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झालं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून एक जागा देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही यावेळी सुनील तटकरे यांनी दिली त्याच बरोबर महादेव जानकर हे विक्रमी मतांनी परभणीतून विजयी होतील असा विश्वासही सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आता महादेव जानकर हे एक एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार बीड लोकसभेच्या भाजपा उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत…

Share This News

Related Post

तात्यांचं ठरलं! ‘या’ दिवशी करणार ठाकरे गटात प्रवेश

Posted by - July 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे आता वंचित ची साथ सोडणार…

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेचा शरद पवार यांनी घेतला समाचार, म्हणाले..

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी आज जोरदार उत्तर दिलं आहे.’एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यातून वक्तव्य…

मोठी बातमी ! दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच ! दाऊदच्या भाच्यानेच केला खुलासा

Posted by - May 24, 2022 0
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे उघड झाले आहे.…

शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देशाचा कायापालट घडून येईल. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने…

संविधानाच्या रक्षकांच्या रक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध : डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : भारतात गेल्या काही वर्षांपासून सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने मनासारखे राजकीय निर्णय घेण्याची सुरुवात केली आहे. यामध्ये काही वेळा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *