Smita Wagh

Smita Wagh : चर्चेतील चेहरा : स्मिता वाघ

294 0

खानदेशमध्ये भाजपने मोठा खांदेपालट केला असून जळगाव लोकसभा मतदार संघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला. गेल्यावेळी हुकलेली संधी स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्याकडे यावेळी चालून आली कारण भाजपने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली. सध्याचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आल असून गेल्यावेळी पाटील हे चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक होते पण पक्षाने लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना डावलून पाटील यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने ही भरपाई आता केली आहे तर जाणून घेऊयात कोण आहेत स्मिता वाघ..

स्मिता वाघ यांचा भाजपशी सर्वात पहिला संबंध 1992 मध्ये आला.तेव्हापासून भाजपच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली, तेव्हा सकुशल काम हाताळले व पक्ष बांधणीचे काम करत अनेक महिलांना पक्षाशी जोडले. 2002 ते 2015 पर्यंत जळगाव जिल्हा परिषदेच्या सलग तीनवेळा सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे जिल्ह्यातील राजकारण त्यांनी चांगलेच जवळून पाहिले आहे.

2005 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सिनेट सदस्या म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवासाने जो वेग धरला, तो पुढे वाढतच राहिला. त्याचा प्रत्यय म्हणून 2009 ला त्या जळगांव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या व त्या बरोबरच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याही झाल्या. याचा परिपाक म्हणजे 2015 मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली, ती त्यांनी लीलया पार पाडली.

त्यांच्याकडे 2017 पासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी आली आहे. 2017 मध्ये त्या विधानपरिषदेच्या आमदार म्हणून निवडून आल्या, तेव्हापासूनच त्यांची पुढची वाटचाल लोकसभेकडे होणार अश्या चर्चा रंगू लागल्या होत्या. 17  व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे त्यांना जळगाव मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Govinda : अभिनेता गोविंदा बनणार का राजकारणात पुन्हा एकदा हिरो नंबर 1?

Pune News : पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये युस्टाच्या नवीन दालनाचा अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते दमदार शुभारंभ

Meenakshi Patil : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

Share This News

Related Post

Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : महाराट्रातील सत्ता नाट्यावर तेजस्विनी पंडितने केलेले ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये आज मोठी फूट पडली आहे. आज अजित…

गुलाम नबी यांची ‘सेकंड इनिंग’; नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा

Posted by - September 4, 2022 0
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली…
Buldhana News

Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - March 1, 2024 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाघाची शिकार…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Posted by - April 12, 2024 0
पालघर : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघरमध्ये जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…
Pune News

Murlidhar Mohol : पुढीलवर्षी पुण्यामध्ये अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सवाचे आयोजन – मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

Posted by - April 19, 2024 0
पुणे : पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत पुढील वर्षीपासून अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सव आयोजित करण्यात येणार असून, विविध देशांमधील बाल चित्रपट बघण्याची संधी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *