Raver Lok Sabha

Raver Lok Sabha : आढावा रावेर मतदारसंघाचा

379 0

रावेर : रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघ हा जळगाव मतदारसंघातून निर्मिती करण्यात आलेला मतदारसंघं आहे.परिसीमन आयोगानं 2008 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती केली होती. नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघात जळगावमधील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर या पाच तर बुलडाण्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 2009 पासून इथं भाजपच्या खासदाराचे वर्चस्व आहे. 2009 मध्ये हरिभाऊ जावळे तर 2014 आणि 2019 मध्ये एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे इथून खासदार बनल्या.

त्यापूर्वी जळगाव मतदारसंघात समावेश असताना इथं सुरुवातीला काँग्रेसचंही वर्चस्व होते. पण 1998 मध्ये उल्हास पाटलांनंतर इथं काँग्रेसला विजय मिळवण्यात यश नाही मिळाले. तसं पाहता या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये भाजपचंच वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये भाजपनं 2014 च्या विजयानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. रक्षा खडसेंच्या विरोधात काँग्रेसनं उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली. पण एकनाथ खडसेंचा प्रचंड प्रभाव असलेल्या मतदारसंघात त्यांना रक्षा खडसेंचा पराभव करणं शक्य झालं नाही. रक्षा खडसे यांनी निवडणुकीत डॉ.उल्हास पाटील यांचा तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.

2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता तेव्हाही एकनाथ खडसे यांची पक्षावर नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. पण रक्षा खडसे यांना उमेदवारी असल्यानं त्यावेळी नाराजी स्पष्टपणे दिसून आली नव्हती. परिणामी खडसेंना असलेल्या पाठिंब्याचा फायदा रक्षा खडसे आणि पर्यायानं भाजपलाही झालाच असं दिसून आले आहे.

2024 मध्ये महायुती कडून रक्षा खडसेंनाच उमेदवारी देण्यात आली असून वंचित कडून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीने अद्याप कुठल्याही उमेदवाराची घोषणा केली नसून नसून हि जागा शरदचंद्र गटाकडे आहे. दरम्यान आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात मात्र त्यामध्येदेखील रावेर मतदार संघाचा समावेश नव्हता. त्यामुळे आता रावेर मतदार संघासाठी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashish Shelar : आशिष शेलार लोकसभा लढवणार ? ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

Sharad Pawar : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

Murlidhar Mohol : खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - December 9, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

राष्ट्रपतीपद निवडणूक ; शरद पवार यांच्या भूमिकेमुळे विरोधीपक्षांना धक्का

Posted by - June 14, 2022 0
नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Manoj Jarange

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

Posted by - March 24, 2024 0
जालना : आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली…

VINAYAK METE ACCIDENT : ड्रायव्हरला योग्य लोकेशन सांगता आले नाही ? राज्य सरकारचा मोठा निर्णय ; वाचा काय म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - August 22, 2022 0
मुंबई : 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघात झाला होता. या…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न ; औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा-उद्योगमंत्री

Posted by - October 19, 2022 0
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *