Dharashiv Lok Sabha

Dharashiv Lok Sabha : आढावा धाराशिव मतदारसंघाचा

330 0

धाराशिव : निजामांची राजधानी असणाऱ्या उस्मानाबाद आणि आताचे धाराशिव शेकापचे नेते भाई उद्धवराव पाटील आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळे धाराशिवला राजकीय क्षेत्रात उदय मिळाला. हा भाग कायम दुष्काळी असल्यामुळे अविकसित जिल्ह्यांच्या यादीत धाराशिव तिसऱ्या क्रमांकांवर आहे. धाराशिव हे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शिवसेना पक्षाचे रवींद्र गायकवाड यांना केवळ 6 हजार मतांनी पराभूत केले होते. 2014 मध्ये शिवसेनेकडून त्याची परतफेड करत गायकवाडांनी पद्मसिंह पाटलांना तब्बल सव्वा दोन लाख मतांनी हरवत बालेकिल्ला परत मिळवला. 2019 मध्ये शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना आखाड्यात उतरवत चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजिंतसिंह पाटील यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. विधानसभेचा विचार केला तर शिवसेनेचे 3, भाजपचे 2 आणि 1 अपक्ष आमदार इथून निवडून आले होते.

धाराशिवमधील डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातला राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास सर्वांनाच माहित असून पवनराजेंच्या हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटलांना अटक देखील करण्यात आली होती. पवनराजेंचे चिरंजीव खासदार ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंहांचे चिरंजीव भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्यातील संघर्ष अद्याप संपलेला नाही.

शिवसेनेचा हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी महायुतीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेसाठी उभी असणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून त्यांना राजकीय रसद मिळणार असून ही लढत आणखीच रंगतदार होणार आहे. निंबाळकर आणि पाटलांमध्ये परंपरागत वैर तर आहेच मात्र त्याला राजकीय विरोधाची धार लागली आहे. शिवसेना ठाकरे कडून आता पुन्हा एकदा ओमराजेंना उमेदवारी देण्यात आली असून राणांची पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट देण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Khadse : शरद पवारांना मोठा धक्का ! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

Weather Update : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला हायअलर्ट

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची लोकसभेची उमेदवारी वंचित कडून रद्द

Pune Accident Video : पुण्यात भरधाव कारची दोघांना धडक ! CCTV फुटेज आलं समोर

Rajashree Patil : चर्चेतील चेहरा : राजश्री पाटील

Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Related Post

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंह यांची माघार; निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे करणार समर्थन

Posted by - September 30, 2022 0
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया…

शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला पूर्वनियोजित;जितेंद्र आव्हाडांचा दावा

Posted by - April 10, 2022 0
शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी…
AJIT PAWAR

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Posted by - June 4, 2023 0
मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा सोमवारी वाढदिवस आहे, या निमित्ताने नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी…

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा; खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

Posted by - January 23, 2023 0
पुणे : कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *