१५ दिवसात अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा…. ; मुंबई महापालिकेचा राणा दांपत्याला अल्टिमेटम

276 0

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरातील अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी राणा दांपत्याला ७ ते १५ दिवसांची मुदत दिली आहे. महापालिकेच्या या नोटीशीनंतर राणा दांपत्य काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

खार येथील राणा दाम्पत्याच्या इमारतीचा अधिकृत आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त बांधकाम का केलं ? असा प्रश्न नोटिशीतून पालिकेतील अधिकाऱ्यांनी विचारला आहे. पालिकेने दिलेल्या नोटिशीनंतर राणा दांपत्याला नियमिततेसाठी अर्ज करता येऊ शकतो. पण सध्या महाराष्ट्रातील राजकारण अधिक तापले असल्याने राणा दांपत्याच्या या अर्जावर पालिका किती विचार करू शकेल हा प्रश्न आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे

दरम्यान, ठाकरे सरकारने ही सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे. खारमध्ये आमचे एकच घर आहे, सेनेतल्या नेत्यांसारखी आमची अनेक घरे नाहीत. ते आमचे घर पडू शकतात. यापूर्वी देखील त्यांनी अनेकांची मुंबईत घरे पाडली आहेत. असे राणा दांपत्याने म्हटले आहे.

Share This News

Related Post

Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणात मुलगी मानसी देसाईने केले खळबळजनक आरोप

Posted by - August 5, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्टला एनडी स्टूडिओत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 5 …

मोठी बातमी ! अनिल देशमुख केईएमच्या अतिदक्षता विभागात दाखल, छातीत दुखत असल्याची तक्रार

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना छातीत दुखत असल्याच्या कारणावरून केईएम रुग्णालयाच्या…

राज्य सरकारच्या ‘या’ नव्या योजनेमुळे रस्ते अपघात होणार कमी ! काय आहे योजना

Posted by - March 25, 2023 0
Edited by : Bageshree Parnerkar : शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वाढलेले अपघात कमी करण्यासाठी जिल्हा स्तरावर आता ‘जिल्हा रस्ता सुरक्षा…
Arrest

कोंढव्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या नऊ जणांना अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - April 10, 2023 0
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या नऊ सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून कम्प्युटर, तीन…

मोदींच्या विरोधात काँग्रेसचे राज्यात उद्यापासून ‘मोदी माफी मागो’ आंदोलन

Posted by - February 8, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यात उद्यापासून ‘मोदी माफी मागो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *