मी भगवंत मान….शपथ घेतो की ; भगवंत मान यांनी घेतली पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

342 0

आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या  25 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगतसिंग यांचे पंजाबमधील वडिलोपार्जित गाव खटकर कलान येथे हा शपथविधी पार पडला.

यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांच्यासह पक्षातील आणि कुटुंबातील काही मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. या शपथविधी सोहळ्याची खास बाब म्हणजे ज्या लोकांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते.

त्यात पुरुषांना पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांसाठी पिंवळ्या रंगाच्या ओढण्या परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिवळ्या रंगाला प्राधान्य देण्यात आले होते.

Share This News

Related Post

Rupali Chakankar

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

Posted by - December 7, 2023 0
पुणे : आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali…

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Posted by - April 10, 2022 0
वसंत मोरे हे उद्या मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप…

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

Posted by - April 3, 2022 0
पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित…
Darshana Pawar Murder Case

Pune Crime : पुणे हादरलं ! राजगडच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

Posted by - June 18, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime) गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळी एका तरुणीचा मृतदेह…

शिवसेना कोणाची ? निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला ग्रीन सिग्नल द्यावा ; शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल

Posted by - September 6, 2022 0
शिवसेना नक्की कोणाची ? याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *