Mahayuti Seat Sharing

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

328 0

मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक (Mahayuti Seat Sharing) आयोगाकडून अधिसूचना जारी होऊनही राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचं घोडं अजूनही अडलं आहे. जी अवस्था सत्ताधारी महायुतीच झाली आहे तीच अवस्था महाविकास आघाडीमधील नेत्यांची झाली आहे. काही जागांवर अजूनही तोडगा निघताना दिसत नाही आहे. या कोणत्या जागा आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

बारामती आणि माढा
या ठिकाणी भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली, तरी त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्याठिकाणी थेट उमेदवार बदलावा अशी मागणी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा महायुतीमध्ये आव्हान निर्माण झालं आहे. याठिकाणी विजय शिवतारे यांना समजावून देखील त्यांनी बंडाचे निशाण कायम ठेवलं आहे. त्यामुळे एकंदरीत सुनेत्रा पवारांविरोधात विरोध वाढत चालला आहे. हर्षवर्धन पाटील सुद्धा अजित पवारांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

अमरावती लोकसभा
अमरावतीच्या जागेवरून सुद्धा भाजपमध्ये डोकेदुखी वाढली आहे. अमरावती लोकसभेला नवनीत राणा यांच्या उमेदवारीचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक भाजप नेते विरोधात गेले आहेत.

सातारा लोकसभा
गेल्या काही दिवसांपासून सातारमध्ये उमेदवार कोण असणार आणि जागा कोणाला सुटणार याचा तिढा कायम आहे. या ठिकाणी अजित पवार गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. मात्र, उमेदवारीचा घोळ अजून संपलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये तळ ठोकला आहे. यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये वाद पाहायला मिळत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Share This News

Related Post

विश्लेषण : कसबा,चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपासाठी का आहे प्रतिष्ठेची ?

Posted by - February 23, 2023 0
भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा 18…

VIDEO : खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - August 12, 2022 0
नागपूर : आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी खाते वाटप आणि इतर विषयावर स्पष्टीकरण…
Raja Shiv Chhatrapati Mahakavya

Raja Shiv Chhatrapati Mahakavya : मुस्लिम मावळ्याची अनोखी ‘शिवनिष्ठा’, छत्रपती शिवरायांवर रचलं ‘महाकाव्य’

Posted by - September 8, 2023 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने (Raja Shiv Chhatrapati Mahakavya) प्रेरित झालेल्या एका मुस्लीम मावळ्यानं एक अनोख कामं केलं आहे. शिवरायांवरील असलेल्या…

MAHARASHTRA POLITICS : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर ? फडणवीस-चव्हाणांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

Posted by - March 16, 2023 0
मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *