लोकसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीही इच्छुकांची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसलाच पसंती पाहायला मिळतीय.. आत्तापर्यंत तब्बल 1633 उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातील सर्व म्हणजे 288 विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. काँग्रेस पक्षाकडे 1635 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये सर्वाधिक अर्ज हे विदर्भातून तर सर्वात कमी अर्ज हे कोकणातून आहेत.
कोणत्या विभागातून किती अर्ज?
1. विदर्भ 485
2. मराठवाडा 325
3. मुंबई 256
4. पश्चिम महाराष्ट्र 303
5. उत्तर महाराष्ट्र 141
6. कोकण 125
एकंदरीतच 1635 उमेदवारी अर्जातून काँग्रेस पक्ष किती जणांना उमेदवारी देतो आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.