कॉमेडी शो ते पंजाबचे मुख्यमंत्री ; कसा आहे भगवंत मान यांचा प्रवास

293 0

पंजाब राज्यात आम आदमी पक्ष मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकलं असून त्याचबरोबर भगवंत मान यांनी विधानसभेची जागाही जिंकली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दलबीर सिंग गोल्दी यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

निकालाच्या दिवशी सकाळी भगवंत मान यांनी गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली होती. ते संगरूर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना येथे पोहोचले होते.

पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांनीही गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली.
सर्व एक्झिट पोलमध्ये असे सांगण्यात आले होते की, यावेळी आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करू शकते.

“आप”ने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले होते. ते सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
भगवंत मान हे सध्या आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. ते दुसरी वेळेस लोकसभेत पोहचले आहेत. ते संगरूर मतदारसंघाचे खासदार आहेत.

धुरी विधानसभा मतदारसंघ याच भागात येतो. पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान 38,000 हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी भारतातील पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात झाला. त्याने पंजाबमधील संगरूर येथील एसयूएस (SUS) कॉलेजमधून बीकॉम BCOM केले आहे. वाणिज्य क्षेत्रात पदवी घेतली.

भगवंत मान यांनी कॉमेडीपासून ते राजकारणापर्यत सर्वत्र स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भगवंत मान यांनी इंद्रप्रीत कौरशी लग्न केलं होते.

भगवंत मान हे सुरुवात मनप्रीत सिंग बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीसोबत सोबत झाली होती. 2012 मध्ये त्यांनी लेहरा विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश मिळाला नाही. यानंतर भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.

2014 मध्ये, भगवंत मान आम आदमी पक्षात सामील झाले आणि आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आपले नाव रिंगण केले. येथे त्यांनी 2 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

Share This News

Related Post

Ram gayte

Ram Gayte : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा देणारे राष्ट्र सेवादलाचे राम गायटे यांचे निधन

Posted by - June 26, 2023 0
नाशिक : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक सदस्य व राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते राम गायटे (वय 97) (Ram Gayte) यांचे…

पुण्याची प्रभाग रचना पुन्हा नव्यानं! तीन की चार सदस्यीय असेल प्रभाग रचना याबाबत मात्र संभ्रम !

Posted by - November 23, 2022 0
महाराष्ट्र : पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिका निवडणुकांसाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्यानं करण्याचे आदेश राज्य सरकारने…
Railway

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Posted by - February 28, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सर्वत्र चर्चा सुरु असणारा एकमेव मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणूक. संपूर्ण देश आगामी निवडणुकीच्या (Indian…

पुणे शहरावर अस्मानी संकट; झाडापडी, पाणी शिरणे, सीमाभिंत कोसळणे अशा घटनांनी पुणेकर हैराण ; आतापर्यंत शहरात घडल्या इतक्या घटना

Posted by - October 18, 2022 0
पुणे : दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 9:45 वाजता पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. गेल्या सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य…
uddhav thackery

Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या टीझरमधून ठाकरेंनी ठाकरी भाषेत शिंदेंवर साधला निशाणा

Posted by - October 22, 2023 0
मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क इथं दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडतो. शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर शिवाजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *