Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

398 0

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले ते 86 वर्षाचे होते. कालच त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास ?
महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे.

Share This News

Related Post

murder

Hingoli News : हिंगोली हादरलं ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाकडून सासूची निर्घृणपणे हत्या

Posted by - May 8, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका जावयाने चक्क आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या (Murder) केली…
India Meet

India Meet : इंडिया आघाडीची समन्वयक समिती जाहीर; ‘या’ नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक (India Meet) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये (India Meet) देशभरातील विरोधी पक्षाचे…
Gondia

धक्कादायक ! झोपलेल्या मायलेकावर धारदार शस्त्राने वार; मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू

Posted by - June 8, 2023 0
गोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या श्रीनगर येथील चंद्रशेखर वार्डामध्ये काल बुधवारी पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तीने आई आणि…
Mumbai Rain

Mumbai Rain : मुंबईला वादळाचा फटका; वडाळा परिसरामध्ये बांधकामासाठी लावण्यात आलेला जिना कोसळला

Posted by - May 13, 2024 0
मुंबई : मुंबईमध्ये पावसाने आणि वादळाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ हतला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह दुपारच्या वेळेत पाऊस…

Breaking News ‘इलेक्शन मध्ये उभे राहू नको नाहीतर…..’ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी

Posted by - April 5, 2023 0
‘इलेक्शन मध्ये उभे राहण्याच्या भानगडीत पडू नको, अन्यथा गोळ्या घालून ठार मारू’ अशी धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *