Ashok Chavan

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

280 0

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी 12 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर आपण काँग्रेसची साथ का सोडली? यावर पहिल्यांदाच सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. अचानक निर्णय घेतला नाही, लोक मला घालवायला बसले होते असं नाही. पण गेले वर्ष दोन वर्ष लोकसभेसाठी जी तयारी असायला हवी होती ती मला दुर्देवानं राज्यात दिसली नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, इंडिया आघाडीमध्ये काय चालले आहे, तुम्ही पाहात आहात. पक्षात काही घडत नव्हत, पक्षाच्या भविष्यावर आमचे भविष्य अवलंबून आहे. मी पक्षासाठी कमी केले आहे का? मी महाराष्ट्रात 82 जागा निवडून आणल्या होत्या, मुख्यमंत्री असताना. 16-17 खासदार निवडून आणले होते. जेंव्हा पक्षाने संधी दिली तेंव्हा मी तसे आऊटपूटही दिले आहे.

बैठकीतून शिबीरातून काहीही साध्य होत नसते, तुम्हाला लोकांशी संपर्क करावा लागतो. वेळोवेळी सांगून सुद्धा काही बदल झालेले मला दिसले नाही. म्हणून मग सांगून उपयोग होत नसल्याने सांगणे सोडून दिले. भाजपला मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस वाटलो असेल, म्हणून त्यांनी आल्याबरोबर मला राज्यसभेत संधी दिली असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Share This News

Related Post

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची नागपुरात बैठक; राज्यातील समस्या, संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांवर विचारमंथन

Posted by - January 9, 2023 0
नागपुर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे. पक्षाची…
medha kulkarni

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…
Jayant Patil

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Posted by - December 31, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत मोठं…

पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा; नितेश राणे यांचं अकबरुद्दीन ओवेसी यांना आव्हान

Posted by - May 13, 2022 0
औरंगाबाद – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचा दर्शन घेतल्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय…

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - December 13, 2022 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शरद पवार यांच्या ओक या निवासस्थानी अज्ञात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *