नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला असून उद्या अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमधून बाहेर येणार आहेत.
1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्ली सरकारनं 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवं मद्य धोरण लागू केलं होतं. त्यानुसार दिल्लीमध्ये 32 झोन बनवण्यात आले होते. प्रत्येत झोनमध्ये जास्तीत जास्त 27 दुकानं उघडली जाणार होता. नव्या मद्य धोरणामध्ये दिल्लीतील सर्व सदारुची दुकानं खासगी करण्यात आली. यापूर्वी राजधानीतील 60 टक्के दारुची दुकानं सरकारी आणि 40 टक्के खासगी होते. नव्या धोरणामध्ये 100 टक्के खासगी दुकानं करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे 3500 कोटींचा फायदा होईल, असा दिल्ली सरकारचा दावा होता. पण, नंतर ही योजना दिल्ली सरकारसाठी डोकेदुखी बनली.