Pratibha Dhanorkar

Pratibha Dhanorkar : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेला; प्रतिभा धानोरकर यांचा खळबळजनक आरोप

464 0

चंद्रपूर : काँग्रेस (Congress) पक्षातलेच काही लोक सातत्याने माझा विरोध करत आहेत आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय, असा खळबळजनक आरोप दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाल्या प्रतिभा धानोरकर ?
गेल्या काही दिवसांपासून मी नाराज असून मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. यामागे आमच्याच पक्षातील लोकांचा हात असून हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून होत असल्याचा गंभीर आरोप देखील प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केली तरी पहिला हक्क माझा आहे. नुकतीच मी काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला याची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे.

त्यावेळी त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले आणि या संदर्भात मी सकारात्मक असल्याचे देखील त्यांनी मला सांगितले आहे. काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही. अद्याप कुठलीही यादी जाहीर झाली नसल्याने याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. मात्र काहीही झाले तरी मी काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार असल्याचा पुनरुच्चार देखील प्रतिभा धानोरकर यांनी बोलताना केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

High Court : आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टपणे सांगितलं

Lok Sabha Elections : MIM राज्यात लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; जलील यांनी केली मोठी घोषणा

Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

मोठी बातमी ! भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, राज ठाकरे यांचा मनसैनिकांना नवा आदेश

Posted by - June 2, 2022 0
मुंबई- मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला पुन्हा हवा मिळाली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय, असं म्हणत राज ठाकरेंनी या विषयाबाबत आपली…
Srinivasa Prasad

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Posted by - April 29, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक चामराजनगरचे भाजपा खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद (Srinivasa Prasad) यांचे रविवारी मध्यरात्री बंगळुरुतील एका खासगी…

उत्तर प्रदेशात भाजप सुसाट!उत्तर प्रदेशच्या विजयावर भाजपाचा पुण्यात जल्लोष 

Posted by - March 10, 2022 0
उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *