Election Commission

Elections : निवडणुकीपूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या भागातील निवडणूक रद्द होते का?

361 0

Elections : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. एखाद्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखला केला पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला किंवा अर्ज भरला, मतदान झाल्यानंतर निकाल लागण्याआधी उमेदवाराचा मृत्यू झाला तर निवडणूक आयोगाकडून निर्णय घेतला जातो.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशमधील मोरादाबादचे भाजपचे उमेदवार कुंवर सुर्वेश सिंग यांचे मतदान पार पडल्यानंतर एका दिवसात मृत्यू झाला होता. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मतदान प्रक्रिया पार पडली असेल आणि त्यानंतर उमेदवाराचा मृत्यू झाला असेल तर निकाल लागेपर्यंत वाट पाहिली जाते. जर मतमोजणीनंतर दुसरा उमेदवार विजय झाला तर पुन्हा निवडणुका घेण्याची गरज पडत नाही. पण, जर मृत उमेदवारच विजयी झाला तर निवडणूक रद्द केली जाते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते.
कारण, या परिस्थितीत निवडून दिलेला उमेदवार लोकांचे प्रतिनिधीत्व करत नाही. लोकांचे प्रतिनिधित्व कायदा 1951 च्या अनुच्छेद 151A नुसार अशा जागेवर निवडणूक आयोगाला 6 महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात.

उमेदवाराचा जर अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला असेल किंवा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेली असेल तर अशावेळी त्या जागेची निवडणूक रद्द केली जाते. उदाहरणार्थ, राजस्थानमधील 2023 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे करणपूरचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अशा ठिकाणी एका नवीन तारखेला निवडणुक घेतली जाते. जेणेकरुन पक्षाकडून अन्य उमेदवाराला तिकीट देण्याची संधी मिळते

एखाद्या उमेदवारचा मतदानापूर्वी किंवा मतदानाच्या नंतर मृत्यू झाल्यास त्यांच्या मतदारांवर तसेच पक्षावर अन्याय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जाते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : एक दोन नव्हे तर तब्बल 38 उमेदवार बारामतीच्या रिंगणात

Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण

Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर

मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Share This News

Related Post

Eknath Shinde Sad

Maharashtra Politics : हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज; शिंदेंकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

Posted by - April 7, 2024 0
मुंबई : राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटताना (Maharashtra Politics) दिसून येत नाही. अनेक जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये…
Sanjay Raut

Lok Sabha : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय…; संजय राऊतांची बोचरी टीका

Posted by - April 28, 2024 0
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एकेकाळचे (Lok Sabha) आपले राजकीय सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…
Sudha Murty

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Posted by - March 8, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तीं (Sudha Murty) यांची…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 12, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वाळूज परिसरातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये पोहायला गेलेल्या…
LokSabha

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Posted by - April 21, 2024 0
लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. आता 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *