एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराला मंत्रीपद; मंत्रीपदासाठी फोन आलेले खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? वाचा सविस्तर

1606 0

आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी वेळी काही मंत्रांचा शपथविधी देखील होणार आहेत. त्यासाठी राज्यातील काही खासदारांना संपर्क झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये नितीन गडकरी, रक्षा खडसे, रामदास आठवले, प्रतापराव जाधव आणि पियुष गोयल यांचे देखील नाव आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या शिवसेनेला देखील मंत्री पदाची संधी मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन आला असून हेच प्रताप पवार कोण आहेत जाणून घेऊया.

प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास

प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास 1990 पासून सुरू झाला. 1992 मध्ये ते बुलढाणा पंचायत समितीचे सदस्य झाले. तर 1995 मध्ये बुलढाणा जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याच वर्षी ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. सलग तीन वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली. 1997 ते 1999 मध्ये ते क्रीडा मंत्री, युवा कल्याण आणि सिंचन राज्य मंत्री, महाराष्ट्र सरकार या पदावर त्यांनी काम केले. पुढे 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2014 ला पुन्हा एकदा त्यांनी आपला खासदारकीचा गड राखला. खाद्य प्रंस्कारण उद्योग मंत्रालय आणि अर्थ संबधित स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. 2019 मध्ये तिसऱ्यांदा खासदार म्हणून प्रतापराव जाधव हे निवडून आले. हाऊस समितीचे सदस्य, ग्रामीण विकास आणि पंचायत राज स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याचबरोबर संसदीय राजभाषा समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळेच आत्तापर्यंतचा अनुभवाचा साठा आणि राजकीय पकड लक्षात घेत त्यांना मंत्रिपद मिळण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

प्रतापराव जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकमेव मंत्रीपद मिळणार आहे. मात्र नेमके कोणते मंत्रीपद त्यांना मिळेल याबाबत स्पष्टता अजून आलेली नाही. आज सायंकाळी जेव्हा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडेल तेव्हाच प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद मिळते का आणि कोणते मंत्रिपद मिळते हे स्पष्ट होईल.

Share This News

Related Post

पहिल्या पतीला सोडलं, केलं दुसरं लग्न; तिसऱ्यानेच पाठवले पत्नीला तसले व्हिडिओ, मोबाईल पाहून पतीची पायाखालची जमीनच सरकली…

Posted by - March 8, 2023 0
उत्तराखंड : हल्द्वानी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने पहिलं लग्न केलं होतं. पण हे पहिलं लग्न…

अखेर गणेश नाईकांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - May 4, 2022 0
नवी मुंबई- एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईक यांच्यावर अटकेची…

मोठी बातमी ! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित, सुप्रिम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

Posted by - May 11, 2022 0
नवी दिल्ली- राजद्रोह कालमाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आलं…

नवरात्री म्हणजे रंगोत्सव ; साड्या तयार आहेत ना ? वाचा या वर्षी कोणत्या रंगाची साडी केव्हा नेसायची आहे ते … !

Posted by - September 23, 2022 0
आपले प्रत्येकच सण हे काहीतरी विशेष देखील घेऊन येतात. त्यामुळे परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होतानाच प्रत्येक भाविक त्या सणाचा आनंद देखील…
Jalgaon Death

काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं! वडिलांच्या पाठोपाठ आठ महिन्यात चिमुकल्याने देखील सोडले प्राण

Posted by - June 13, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचा पहिला दिवस एका विद्यार्थ्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *