महत्वाची बातमी: “…तर एकनाथ शिंदे यांना द्यावा लागू शकतो मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा;शिंदे-फडणवीस सरकारसाठी उद्या महत्त्वाचा दिवस

261 0

मुंबई :11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस शिंदे-फडणवीस सरकारसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उद्या सुनावणीमध्ये जर 16 आमदारांचा निलंबन केलं तर 16 आमदारांना अपात्र करण्यात येऊ शकतं.परिणामी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. “आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.न्यायव्यवस्थेचे काम किती दबावाखाली चालू आहे हे आम्हाला माहिती आहे.परंतु देशाला हे समजेल की या देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. आम्हाला उद्या न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.”असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
त्यामुळे उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.जर हा निर्णय बंडखोर आमदारांच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा राजकीय भूकंपासह मध्यावधी निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

15 ऑगस्टची सुट्टी रद्द ; योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय

Posted by - July 16, 2022 0
उत्तर प्रदेश : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 15 ऑगस्ट या दिवशी उत्तर प्रदेश मधील सर्व शाळा,महाविद्यालये,सरकारी कार्यालय आणि खाजगी…

मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश

Posted by - June 2, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष…
Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिश्राच्या पत्नीने केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) हत्या प्रकरणात काल (शुक्रवारी) पहिली अटक करण्यात आली. या…
Ajit Pawar

Ajit Pawar : मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांनी माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम केला रद्द

Posted by - October 28, 2023 0
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *