Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …

592 0

मुंबई : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Eknath Shinde) होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, नव्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे याचा खूप आनंद आहे. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे. करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण होत आहे. नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे.

नव्या महाराष्ट्राचे चित्र
आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की महायुती सरकारने राज्यात दुर्बल, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला यांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक निर्णय घेतले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, एकीकडे उद्योग, पायाभूत सुविधा वाढवतांना सामाजिक न्यायाचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदार, उद्योगपतींचा ओढा दिवसागणिक वाढतो आहे. नुकतेच आपण परकीय गुंतवणुकीत परत एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. नव्या वर्षात महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. हे प्रकल्प आयकॉनिक असणार आहेत. एमटीएचएल, कोस्टल रोड, मेट्रो, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प सुरु होतील आणि राज्याची वाटचाल वेगानं १ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होऊ लागेल, असा विश्वास मला वाटतो.

विकासासाठी नव्या संकल्पना सुचवा
मुख्यमंत्री म्हणतात की, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा जागतिक दर्जाच्या करणं यासाठी देखील आपण एक मोठं व्हिजन ठेवलं आहे. ही सगळी वाटचाल एकट्याने नाही तर आपल्या सगळ्यांच्या सहभागानं आणि योगदानानं होणार आहे. विकासासाठी आपण नव्या संकल्पना सुचवा, आपले विचार नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका

Accident News : थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर अचानक ठरलेल्या पिकनिक प्लॅनमुळे 6 मित्रांना गमवावा लागला जीव

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट

Nitin Kareer : नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव

Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी

Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Share This News

Related Post

Pankaja Munde

Pankaja Munde : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पुण्यात घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट

Posted by - March 21, 2024 0
पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीडमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना…

#MADHAV BHANDARI : राज्यातील प्रत्येक घटकाला आनंद देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Posted by - March 14, 2023 0
‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे ‘पंचामृत’ सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक घटकाच्या आशांना प्रतिसाद…

लंपी नियंत्रणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक

Posted by - September 19, 2022 0
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण…

संजय राऊतांवरील कारवाईचं मूळ ‘म्हाडा’च्या त्या एका तक्रारीत

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत ईडीनं गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.   मात्र संजय राऊत…

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपला वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे पुन्हा वापस आणू,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *