एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार

285 0

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते. पूजा केल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर मोठा उत्साह दिसून आला. त्यांचे स्वागत करण्यासाठी समर्थक आमदार, पदाधिकारी, अधिकारी यांची गर्दी झाली होती.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

Share This News

Related Post

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

Posted by - April 20, 2022 0
सातारा – खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना…

ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं; आशिष शेलार यांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Posted by - January 28, 2022 0
मुंबई – विधीमंडळाने केलेले 12 भाजप आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने आज रद्द केले. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला…

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र; केली ‘ही’ विनंती

Posted by - October 16, 2022 0
मुंबई: नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची भेट घेतल्यानंतर आता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 8, 2022 0
मुंबई:महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Posted by - February 26, 2024 0
जालना : जालना जिल्ह्यातून (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *