शिवसेना कुणाची ? ठाकरेंची की शिंदेंची ? (संपादकीय)

214 0

शिवसेना कुणाची ? ठाकरेंची की शिंदेंची ? हाच सवाल आज अवघ्या महाराष्ट्रासमोर उभा ठाकलाय. शिवसेना कुणाची हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला तर उत्तरं मिळेल बाळासाहेबांची ! हाच प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारला तर उत्तर मिळेल बाळासाहेबांची ! आणि शेवटी हाच प्रश्न तमाम शिवसैनिकांना विचारला तर पुन्हा तेच उत्तर मिळेल शिवसेना बाळासाहेबांची ! मग, ही शिवसेना बाळासाहेबांचीच असताना शिवसेना नक्की कुणाची हा प्रश्न का पडला ?
…………………………..
कट्टर शिवसैनिक, शिवसेना नेते आणि विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि तिथून हा प्रश्न खऱ्या अर्थानं उभा राहिला. एक-दोन नव्हे तर शिवसेनेचे तब्बल 40 आमदार सोबत घेऊन शिंदेंनी ‘शिंदे गट’ तयार केला आणि स्वपक्षालाच धक्का दिला. गेली पाच दिवसांपासून हा शिंदे गट सूरतमार्गे गुवाहाटीत जाऊन बसलाय. ‘मविआ सरकारमधूनबाहेर पडा आणि भाजपशी युती सत्ता बनवा, अशी ताठर भूमिका शिंदे गटानं घेतलीये तर ज्यांनी ‘मातोश्री’वर, ठाकरे कुटुंबावर आरोप केले त्या भाजपासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेनेनं घेतलीये.

आधी आवाहन मग आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांना आधी आंजारून-गोंजारून पाहिलं, भावनिक साद घालून पाहिलं पण त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचं दिसून येताच ठाकरी शैलीत आव्हान दिलं. आता परत येताय की कारवाई करू, असा सज्जड दमच भरला. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांविरुद्ध निलंबनाच्या नोटिसा, त्यानंतर मंत्रिपदावरून हटवण्याच्या हालचाली आणि बरंच काही… पण शिंदे गट काही या नोटिशी-कारवायांना घाबरल्याचं चित्र सध्या तरी दिसत नाही.

शिवसैनिक संतापले; बंडखोरांचे कार्यालय फोडले, पोस्टर फाडले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेळप्रसंगी शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर काही खरं नाही, असं वक्तव्य करताच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील शिवसैनिक पेटून उठले आणि रस्त्यावर उतरले. कुठं कार्यालयांची तोडफोड करण्यात आली, पोस्टर फाडले गेले तर कुठं प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

शिवसेना-शिंदेंसेना यांच्यात वाद; भाजपाचं मात्र वेट अँड वॉच !

केव्हा तरी पहाटे झालेल्या शपथविधीचा कटू अनुभव गाठीशी असल्यानं आता ताकही फुंकून प्यायचा, अशी भूमिका भाजपनं घेतलीये. शिंदे गटाकडून आमच्याकडं अजून तरी कोणताही प्रस्ताव आलेला नाही शिवाय शिंदे गटाचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, असं म्हणत भाजपची नेतेमंडळी वेळ मारून नेत आहेत किंवा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहात आहेत.

एकूणच काय तर मविआ सरकारच्या मुख्य पक्षातील हे बंड लवकर थंड केलं गेलं नाही तर महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापत जाणार हे नक्की !

 

 

 

 

संदीप चव्हाण
– वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

Maharashtra Politics : शरद पवार यांची सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली भेट, पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील ज्येष्ठ, अनुभवी, अभ्यासू नेते म्हणून त्यांचा सर्वच राजकीय पक्षाचे नेते आदर करत…
NCP

NCP : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - November 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये मोठी फूट…
Mahadev App

Mahadev App : ‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणात नवी अपडेट; मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : ‘महादेव अ‍ॅप’ (Mahadev App) प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक…

“ही बैठक नव्हती”…! शिवसेना बैठकीमध्ये खासदारांच्या अनुपस्थितीबाबत आ.अंबादास दानवे यांचे स्पष्टीकरण

Posted by - July 11, 2022 0
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या लोकसभा खासदार आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. या…

मशिदीवरचे भोंगे बंद होत नसतील तर हनुमान चालीसा लावा – राज ठाकरे

Posted by - April 2, 2022 0
मी अयोध्येला जाणार आहे, पण तारीख अद्याप निश्चित झाली नाही. आपण जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *