घोडीवर मांड ठोकून डॉ. अमोल कोल्हे बैलगाडी शर्यतीत, दिलेला शब्द पाळला

235 0

पुणे- बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन असं आश्वासन खासदार डॉ. यांनी दिले होते. या आश्वासनाची आठवण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून देताच खासदार कोल्हे यांनी आज दावडी निमगावच्या यात्रेत भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये घोडीवर बसून आपला शब्द खरा करून दाखवला.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती उत्साहात पार पडल्या. त्यानंतर आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीचे करण्यात आले होते. यामध्ये एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन खासदार कोल्हे यांनी दिले होते.

कोल्हेंना त्यांच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. ‘खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे म्हटले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनीही रुबाबदार एंट्री मारत घोडी धरून आढळराव पाटलांनी दिलेलं आव्हान पूर्ण केले.

Share This News

Related Post

Abdul Sattar : सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ भाजप नेत्याने केली मागणी

Posted by - June 14, 2024 0
सिल्लोड : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे.…

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सीताराम कुंटे त्यांचा इडी समोर जबाब

Posted by - January 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार…

कोण होती दिशा सालियन ? नेमकं काय घडलं ! CBI च्या अहवालानुसार …

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना…

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…

मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून हिंगोलीतील कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - May 12, 2022 0
मुंबई- मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *