chagan Bujbal

Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा

406 0

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) सहा टप्प्यांसाठी मतदान पार पडलं आहे. सातव्या टप्प्यासाठी एक जूनला मतदान होणार आहे. तर चार जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा गाजायला लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीला जागावाटप करताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?
‘श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल, डॉ. तावरे यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Share This News

Related Post

Shivsena

Shivsena : शिवसेनेच्या ‘या’ 2 आमदारांची प्रकृती बिघडली; लिलावती रुग्णालयात केले दाखल

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) दोन आमदारांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

पुणे : आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे; पुण्यातील फलकाची राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - October 10, 2022 0
पुणे : निवडणूक आयोगाकडूनधनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं निधन

Posted by - December 30, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. शानदार शताब्दी…

आझाद मैदानावर संभाजी राजे छत्रपती 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसणार पुणे जिल्ह्यातून पाठिंब्यासाठी हजारो बांधव जाणार – राजेंद्र कोंढरे (व्हिडिओ)

Posted by - February 17, 2022 0
17 जून 2021 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्री गणा सोबत झालेल्या बैठकीमध्ये या मागण्या शासनाने मान्य करून…

पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *