Sharad Pawar And Devendra Fadanvis

Sharad Pawar : माझ्या राजकीय गुगलीवर फडणवीसांची विकेट गेली : शरद पवार

891 0

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मोठं विधान केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना शरद पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली होती. पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांच्या पाठिंबा होता. पण 4 दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठींबा काढला, असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या आरोपावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली. आपण टाकलेल्या राजकीय गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली , असं शरद पवार म्हणाले.

Devendra Fadanvis: शरद पवारांनी ‘त्या’ शपथविधी आधीच भूमिका बदलली; फडणवीसांची टीका

भाजपला 2014 आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.त्या वेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते. तो काळ वेगळा होता पण नंतरच्या काळात त्यांनी जे सांगितलं की, ते भेटले ,.त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा झाली ही गोष्टही खरीय. त्यांनी स्वत: सांगितलंय की, मी पाठींबा दिला होता. पण मी दोन दिवसांनी निर्णय बदलला. जर दोन दिवसांत निर्णय बदलला हे माहिती होते.तर फडणवीसांनी दोन दिवसांनी अशी चोरुन पहाटे शपथ का घेतली ? असा सवाल शरद पवार यांनी केला.

“आमचा त्यांना पाठींबा होता तर दोन दिवसात त्यांची सत्ता कशी गेली. त्यांना राजीनामा का द्यावा लागला ? याचा अर्थ स्पष्ट आहे. सत्तेसाठी भाजपा कुठेही जाऊ शकतो, हे एकदा समाजासमोर यायला पाहिजे होत. या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे सत्तेसाठी काहीही करु शकतात, कुठेही जाऊ शकतात, हे सगळं समजून घेण्याची वेळ आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू

“हा राजकीय डाव होता का? ते मला माहिती नाही. पण माझे एक सासरे देशातले उत्तम गुगली बॉलर होते. गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या बॅट्समनच्या विकेट घेतल्या होत्या. मी “आयसीसी” चा अध्यक्ष होतो. मी जरी खेळलो नसलो तरी मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? माहिती होतं. त्यामुळे फडणवीसांची विकेट गेली. मला अधिक काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.

Share This News

Related Post

Junnar News

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Posted by - May 4, 2024 0
जुन्नर : बैलगाडा शर्यतीचा थरार पुण्यातील जुन्नर (Junnar News) येथे पाहायला मिळाला. या शर्यतीदरम्यान एक थरारक घटना समोर आली. यामध्ये…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 13, 2024 0
पुणे : ऐतिहासिक वारसा जतन करण्यात गिरीप्रेमी आणि दुर्गप्रेमींचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. गिर्यारोहक आणि सायकलपटूंचा उत्साह पाहून नक्कीच मला…
Gas Cylinder

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Posted by - April 1, 2024 0
मुंबई : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. देशातील चार महानगरांमध्ये गॅसचे…

PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

Posted by - August 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना प्रवक्त्यांची बैठक

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *