मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार, ठाकरे सरकारला घेरण्याची भाजपाची रणनीती

92 0

मुंबई- दाऊदशी व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी व्यक्ती मंत्रिपदी कायम आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे. असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. उद्या, गुरुवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा भडीमार केला. महाविकासआघाडीचे नेते अलीकडे कोणतीही कारवाई झाली तरी महाराष्ट्र झुकणार नाही, असा डायलॉग मारतात. पण महाविकासआघाडीचे नेते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यातील १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना हा महाराष्ट्र झुकवून दाखवेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला.

मुंबईच्या खुन्याशी व्यवहार खपवून घेणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. आम्ही येत्या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहोत असे फडणवीस म्हणाले. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी व्यक्ती मंत्रिपदी कायम आहे. हा राज्यघटनेचा अवमान आहे. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या कार्यकाळात मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे, हे दुर्दैव आहे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली पाहिजे, ही सरकारी पक्षाची भूमिका राहिली पाहिजे. सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून ठाकरे सरकारची ओळख निर्माण झालीय, असे फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही. अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही. पण आता कनेक्शन कापले जात आहेत. यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Share This News

Related Post

Rahul Narvekar

Rahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात, पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष; कसा आहे नार्वेकरांचा प्रवास

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी जाहीर केला. आज आपण निकाल जाहीर…
Devendra Fadanvis

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ प्रकरणाची दखल घेत गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 16, 2023 0
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) एक धक्कादायक प्रकार घडला होता. यासंदर्भात आता एक मोठी बातमी…
Dhangar Reservation

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - December 26, 2023 0
लातूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation) मागणी जोर धरताना दिसत आहे. सरकारकडून आश्वासन मिळूनही…

OBC reservation : ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत जाहीर निवडणुकांना स्थगिती द्या;पंकजा मुंडे यांची राज्य सरकारला विनंती

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणीला आज सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नांमुळे…
Prakash Ambedkar

Vanchit Bahujan Aaghadi : 25 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची मुंबईत पार पडणार ‘संविधान सन्मान महासभा’!

Posted by - November 20, 2023 0
मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *