Sharad-Pawar-Sanjay-Raut-Uddhav-Thackeray

Deepak Kesarkar : उद्धव ठाकरे मविआमधून बाहेर पडणार होते, पण शरद पवारांना कळालं अन्..; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

374 0

पुणे : शिवसेनेचे मंत्री आणि नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे युती तोडायला तयार होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ते दिल्लीमध्ये बोलणार होते. त्यांची युती होणार होती असा दावादेखील दीपक केसरकर यांनी यावेळी केला.

नेमके काय म्हणाले दीपक केसरकर?
महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे आघाडी तोडायला तयार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचं दिल्लीमध्ये बोलणं होणार होतं. त्यांची युती होणार होती. मात्र संजय राऊत यांनी हे शरद पवार आणि अजित पवार यांना जाऊन सांगितलं. मग आता तुम्हीच सांगा खलनायक कोण आहे ते? एकनाथ शिंदे दुसरं काहीही मागत नव्हते, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की आपण भाजपसोबत जाऊ असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

यावेळी दीपक केसरकर यांनी मराठा आरक्षणावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्यावेळी सुप्रीम कोर्टात आरक्षण टीकलं नाही. आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, ते फक्त टीकणारं आरक्षण असावं. त्यामुळे ते टीकण्यासाठी काय करता येईल हे आता पाहिलं पाहिजे असं केसरकर म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

eknath shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि…
Cabinet Decision

Cabinet Decision: गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज पार पडलेल्या…
Report On Voter

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Posted by - April 22, 2024 0
पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून देशातील अनेक मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील शिरूर…
Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Posted by - February 17, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलेला आरोपी पळून (Sharad Mohol Murder) गेल्याची घटना समोर आली…
Pune Crime

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Posted by - April 17, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये घरी लग्नाची धामधूम सुरू असताना नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *