महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं; उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंचं उत्तर

144 0

बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मला कोणताही मोह नाही. असा भावनिक संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकासआघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि
शिवसैनिक भरडला गेला असून घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे,शिवसेनेचे मात्र पद्धतशीर
खच्चीकरण होत असल्याचं शिंदे यांनी म्हंटलं आहे.

पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

Share This News

Related Post

Mukesh Ambani

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Posted by - January 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची…

Governor Bhagat Singh Koshyari : ” समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी “

Posted by - August 16, 2022 0
पुणे : उत्तम कार्यासाठी चांगला दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सेवाकार्य करताना असा चांगला दृष्टिकोन ठेऊन  मूल्यांची पेरणी व्हावी,…

पीएमपीएल चालकाच्या प्रसंगावधानामुळे २२ प्रवाशांचा वाचला जीव ; शिंदवणे घाटातील घटना

Posted by - May 20, 2022 0
पुणे- शिंदवणे घाटातून उरळीकांचनच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील २२ प्रवाशांचा जीव वाचला.…

MP Tejasvi Surya : ” स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचं योगदान काय विचारणाऱ्यांनी भाजयुमोकडे शिकवणी लावावी ” VIDEO

Posted by - August 13, 2022 0
पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय असं विचारणाऱ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाकडे शिकवणी लावावी, असं मत भारतीय…

पीएमआरडीए विकास आराखड्यावर सोमवारपासून सुनावणी

Posted by - March 11, 2022 0
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने प्रारूप विकास आराखड्यावर आलेल्या हरकती, सूचनांवर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या सोमवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *