राज्यातील सत्तासंघर्षावर आज फैसला? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

413 0

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सुनावणीत मिळणार आहेत. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे.

कोणत्या 16 आमदारांवर कारवाईची मागणी ?

  • एकनाथ शिंदे
  • अब्दुल सत्तार
  • तानाजी सामंत
  • यामिनी जाधव
  • संदिपान भुमरे
  • भरत गोगावले
  • संजय शिरसाट
  • लता सोनावणे
  • प्रकाश सुर्वे
  • बालाजी किणीकर
  • बालाजी कल्याणकर
  • अनिल बाबर
  • महेश शिंदे
  • संजय रायमुलकर
  • रमेश बोरनारे
  • चिमणराव पाटील
Share This News

Related Post

ajit pawar and supriya sule

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - May 1, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित…

डॉ. कारभारी काळे पुणे विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू

Posted by - May 18, 2022 0
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र…
Manoj Jarange

Maratha Reservation : अजितदादा, अमित शाह यांच्या भेटीवर जरांगे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - November 11, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील…
Saswad Crime

धक्कादायक ! सासवडमध्ये रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कारने चिरडले

Posted by - June 5, 2023 0
पुणे : पुण्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एका व्यवसायिक कार चालकाने…

एनडीए सरकारमध्ये ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असलेल्या जेडीयू आणि टीडीपीकडून कोण घेणार मंत्रीपदाची शपथ

Posted by - June 9, 2024 0
देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा सरकार स्थापन होणार असून  नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. एनडीए…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *