Decision of Cabinet meeting : ग्रामीण भागात भूमीहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

276 0

मुंबई : ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना प्रधान मंत्री आवास योजना- शहरीच्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित करण्यात येईल. लाभार्थींनी खरेदी केलेल्या जागेकरिताच मोजणी शुल्कामध्ये 50 टक्केपर्यंत सवलत देण्यात येईल.

500 चौ. फूट कृषी जमीन खरेदी करतांना तुकडे बंदी कायद्यातील अट लागू होणार नाही अशी अधिनियमात सुधारणा करण्यात येईल. लाभार्थींना 2 मजली ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात येईल.

गायरान जागा लाभार्थींना भाडेपट्टयाने देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.
ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांकडे सादर करून 90 दिवसाच्या आत मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले.

Share This News

Related Post

Sharad-Pawar-Sanjay-Raut-Uddhav-Thackeray

Deepak Kesarkar : उद्धव ठाकरे मविआमधून बाहेर पडणार होते, पण शरद पवारांना कळालं अन्..; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - October 16, 2023 0
पुणे : शिवसेनेचे मंत्री आणि नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेल्या या…
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण

Posted by - December 8, 2023 0
इंदापूर : सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नवाब मलिक यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून वाद…
Buldhana News

Buldhana News : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

Posted by - June 27, 2023 0
बुलढाणा : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून तिकडे अपघाताचे प्रमाण (Buldhana News) वाढतंच चालले आहे. ते काही थांबायचे नाव घेईना. अशीच…

पुणेकरांसाठी उपयुक्त माहिती : पुणे महापालिकेच्या 80 सेवा आता व्हॉट्सॲपवर ; व्हॉट्सॲपवर सेवा देणारी देशातील पुणे पहिली महापालिका

Posted by - January 11, 2023 0
पुणे : नागरिकांशी संवाद साधणं सोपं व्हावं यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप बॉट अर्थात माहिती देणाऱ्या स्वयंचलित यंत्रणा प्रणालीवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *