Danve- Khaire Battle

Danve- Khaire Battle : अखेर ! दानवे- खैरेंची दिलजमाई; दानवे- खैरेंच्या वादाचं नेमकं कारण काय ?

360 0

पुणे : जागावाटपाच्या मुद्द्यावरून सध्या अनेक नेत्यांचे रुसवे फुगवे समोर येत आहेत. एखादी जागा दुसऱ्या पक्षाला दिल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांवर, उमेदवारांवर नेतेमंडळी नाराज (Danve- Khaire Battle) असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मात्र एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांवर प्रचंड नाराज असल्याच्या घटना कधीतरीच घडतात. अशीच घटना अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटात घडत होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात रंगलेल्या कोल्ड वॉरला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू आहे. कारण आज या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत त्यांनी एकमेकांना पेढा देखील भरवला. पण या दोघांचा संघर्ष नेमका का आणि कधीपासून होता हे जाणून घेऊया TOP NEWS च्या खास रिपोर्ट मधून…

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाच्या पारड्यात पडल्यामुळे या जागेसाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही नेते इच्छुक होते. पण खैरे यांना या जागेवरून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर नाराज झालेले अंबादास दानवे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते‌. मात्र त्या चर्चांना स्वतः दानवेंनीच ब्रेक लावला. आणि अखेर आज दानवेंनी खैरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पक्षांतर्गत वादाची एक मोठी चिंता मिटली आहे.अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचे आज मनोमिलन झाले. मात्र या दोघांमध्ये गेल्या एक दशकापासून संघर्ष सुरू होता. त्या मागे नेमकी कारण काय हे सुद्धा जाणून घेऊया…

या दोघांमध्ये नेमका वाद काय?
अंबादास दानवे हे 2014 पासून छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र याच मतदारसंघातून त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे उमेदवार म्हणून उभे राहिले असल्यामुळे दानवेंची संधी हुकली. वारंवार खैरेंमुळे आपल्याला डावलले जात असल्याची खदखद व्यक्त केली. तर अंबादास दानवेंमुळेच आपला मागच्या निवडणुकीत पराभव झाला असा आरोप खैरे यांनी केला. तर खैरे अधिकृत उमेदवार असतानाही दानवेंनी त्यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्याचे जाहीर केले होते. तर आपण फक्त पक्षाचे काम करू खैरेंचा वैयक्तिक प्रचार करणार नाही, अशी ठोस भूमिका दानवेंने घेतली होती. या दोघांमध्ये वाद इतक्या टोकाला गेले होते की स्वतः उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करावी लागली. उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर या दोघांमधल्या वादावर पडदा पडला आहे. या भेटीनंतर निवडणुका, पदं येतात जातात पण पक्षाचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे आम्ही दोघेही आता एकत्र आहोत आणि आपण खैरेंच्या प्रचारातही सहभागी होणार आहोत, अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे. तर दानवेंनीच तुम्हाला मागच्या निवडणुकीत पाडले होते का? या प्रश्नावर खैरेंनी मागचं सर्व सोडून द्या आता आम्ही एकत्र आहोत, असे उत्तर दिले. त्यामुळे या दोघांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरे गटाला थोडं हायसं वाटत असेल. मात्र खरोखर या दोघांमध्ये सारं काही अलबेल आहे का? हे निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतरच कळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : भरधाव कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Lok Sabha Elections : हर्षवर्धन जाधव पुन्हा छ. संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Related Post

Shashikant Shinde

Satara Loksabha : ‘…तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही’ शशिकांत शिंदेंनी विरोधकांना ठणकावून सांगितलं

Posted by - April 27, 2024 0
सातारा : सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघातील निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. या मतदार संघात भाजपकडून उदयनराजे भोसले यांना…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Posted by - May 8, 2024 0
पुणे : देशासह राज्यातील 11 मतदारसंघात काल लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे…
SANJAY RAUT

मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

Posted by - August 8, 2022 0
मुंबई  : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात…
Harshvardhan Patil

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

Posted by - March 4, 2024 0
इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी…
Manoj Jarange Patil

Manoj Jarange : …तर विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार; मनोज जरांगे पाटलांची पुण्यात मोठी घोषणा

Posted by - May 31, 2024 0
पुणे : आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले होते. 2013…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *