karekar

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

279 0

नागपूर : शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपुरात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांच्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांच्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या हत्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करत मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत त्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर देखील आरोप केल्यामुळे भाजपच्या विधी सेलने आचारसंहितेचा भंग करत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद-

याच तक्रारीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिल्यनानंतर सादर केलेल्या तक्रारीवरून वडेट्टीवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमके काय म्हणाले होते वडेट्टीवार?

हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हे तर ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम असून अश्या देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर मात्र भाजप देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे, असे वक्तव्य करत पुढे बोले की कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याचे गरज नसून तालुका लेव्हलच्या बेलआऊट करणाऱ्या वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही कसाबला फाशी झाली असती. कारण कसाब हा दहशतवादी होता. त्यामुळे त्याला फाशी झालीच असती. त्यामुळे यामध्ये उज्ज्वल निकम यांनी डिंग मारण्याचे किंवा बडेजाव मिरवण्याचे कारण नसून विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखलं होतं, असे विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

Share This News

Related Post

Pune News

Pune News : कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही : रामदास आठवले

Posted by - May 2, 2024 0
पुणे : संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून (Pune News) करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही,…
Supriya Sule

Supriya Sule : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Posted by - October 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शांततेत उपोषण आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे आरक्षण…

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी (व्हिडिओ)

Posted by - February 5, 2022 0
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केल्यानंतर सोमय्या राऊतांविरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजी नगर…
election-voting

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

Posted by - April 1, 2023 0
केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला असून अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *